माझ्या समोर तीन पर्याय होते...ठाकरेंची साथ सोडल्यावर राजन साळवींचा मोठा खुलासा

उद्धव ठाकरेंची साथ सोडत राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश करण्याच निर्णय घेतला आहे. पण शिंदे गटातच का प्रवेश? दिली सविस्तर माहिती

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 13 Feb 2025
  • 07:48 am
Rajan Salvi,SHIVSENA,Maharashtra poolitics,'Eknath Shinde,#uddhav thackeray

Rajan Salvi

उद्धव ठाकरेंची साथ सोडत राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश करण्याच निर्णय घेतला आहे. आज दुपारी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत साळवी पक्षप्रवेश करणार आहेत. दरम्यान, त्यांनी ठाकरेंची साथ का सोडली? यावर मोठं वक्तव्य केलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागे नेमकं कारण काय याचा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. 

साळवींसमोरील तीन पर्याय कोणते?

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत साळवी बोलत होते. 'सलग तीन विधानसभा निवडणुकीत मी विजयी झालेला आमदार आहे .2024 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. त्या पराभवाची कारण मी उद्धव ठाकरेंकडे कथन केलीत.

सगळा प्रकार मी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातला. त्यानंतर आज मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे .आम्हाला विश्वास आहे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आमच्या मतदारसंघात विकास करेल .याच विश्वासाला माझ्या कार्यकर्त्यांनी ही साथ दिली . उद्धव ठाकरे यांच्यासमोर मी माझ्या भावना व्यक्त केल्यानंतर मी थोडे दिवस शांत होतो .

....म्हणून मी निर्णय घेतला आहे

मला विश्वास आहे की भविष्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृ्त्वाखाली या मतदारसंघात आपण काम करु आणि या माझ्या विश्वासाला सहकाऱ्यांनी मतदारसंघातील लोकांनी साथ दिली म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. 

माझ्याकडे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यापैकी तीन पर्याय होते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत .आमची निशाणी एकनाथ शिंदेंकडे आहे .त्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांची जाणीव झाली की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपण गेलं पाहिजे .एकनाथ शिंदेंचं काम आणि त्यांनी केलेली विकास काम याबद्दल सगळे आमचे कार्यकर्ते समाधानी आहेत.असेही राजन साळवी यावेळी म्हणाले .

माझ्या पराभवाला जे कारणीभूत आहेत हे सगळं तुमच्यासमोर आलं आहे .मी प्रवेश करेन तेव्हा पत्रकार परिषद घेऊन आणखी सविस्तर सांगेन, असेही साळवी म्हणाले.

Share this story

Latest