संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री (दि. १२ ऑक्टोबर) गोळीबार झाला. मुंबईसह महाराष्ट्र या घटनेने हादरला आहे. मुंबईतील बांद्रा येथील निर्मल नगर जवळ येथे सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. त्यानंतर त्यांना तातडीने लिलावाती रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र पोटात आणि छातीत गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. बाबा सिद्दीकी यांना नुकतीच ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा मिळाली होती, परंतु तरीही त्यांची हत्या झाली. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
हल्लेखोरांची नावे आली समोर
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची नावे समोर आली आहे. करनैल सिंह, आणि धर्मराज कश्यप अशी या दोघांची नावे आहेत. दरम्यान यांच्या सोबत अजून एक तिसरा आरोपी होता. मात्र तो फरार आहे. करनैल सिंह हा हरियाणाचा राहणारा आहे आणि धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशातला राहणारा आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चार पथकांनी तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी राज्याबाहेर मोहीम राबवली आहे.तसेच या हत्येत चौथा आरोपीही असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
हत्येचं कारण काय?
मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील संत ज्ञानेश्वर नगर एसआरए प्रकल्पात झिशान सिद्दिकी आणि बाबा सिद्दिकी यांचा विरोध होता. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला केल्याच्या रागातूनच गोळीबार केला अशी चर्चा आता वांद्रे पूर्व परिसरात रंगली आहे.