Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला अपघात; तुपकर सुखरूप

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्यभर दौरा करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या ‘लोकरथ’ नावाच्या इनोव्हा वाहनाला शनिवारी मध्यरात्री अपघात झाला. ही दुर्घटना वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्याजवळ रात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Sunil Chavan
  • Sun, 18 May 2025
  • 01:15 pm
pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्यभर दौरा करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या ‘लोकरथ’ नावाच्या इनोव्हा वाहनाला शनिवारी मध्यरात्री अपघात झाला. ही दुर्घटना वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्याजवळ रात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास घडली.

तुपकर लातूर येथे सभा संपवून पुढील दौऱ्यासाठी निघाले होते. त्यांच्यासाठी लोकवर्गणीतून घेतलेली ‘लोकरथ’ ही इनोव्हा कार वाशी तालुक्यातील टोलनाक्याजवळ अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या अपघातात रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र, गाडीत अन्य दोन सहकाऱ्यांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.राज्यातील विविध भागात कर्जमाफी आणि शेतकरी हितासाठी जनजागृती करणाऱ्या तुपकर यांच्या दौऱ्यातील ही घटना शेतकरी संघटनांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. शेतकरी नेत्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Share this story

Latest