Maharashtra Politics
विधानसभा निवडणूकीत 132 जागा जिंकत भाजप महायुतीतला सर्वात मोठ पक्ष ठरला. अशातच मुख्यमंत्रीपदही भाजपकडेच आले. त्यामुळं राज्यात आणि महायुतीत भाजपचाच वरचष्मा असल्याचे पाहयला मिळत आहे. एककीडे पालकमंत्री पदावरुन वादा सुरु असतानाच भाजपने मोठी खेळी खेळली आहे. ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही तिथे संपर्कमंत्री नेमण्यात आलं आहेत.
सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भाजपकडून भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री काम करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपचा संपर्कमंत्री नेमून अप्रत्यक्षपणे मिक्षपक्षाला धाकात ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी संपर्कमंत्री पदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. 'ज्या ठिकाणिी मित्रपक्षाचे पालकमंत्री आहेत, त्याचठिकाणी भाजपने संपर्कमंत्री नेमले आहेत. 17 जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्र्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.' अशी माहितीही बावनकुळे यांनी यावेळी दिली.
कोण कुठे पालकमंत्री अन् कुठे भाजपचे संपर्कमंत्री?
ठाणे- गणेश नाईक, पालकमंत्री एकनाथ शिंदे
बीड- पंकजा मुंडे, पालकमंत्री-अजित पवार
संभाजीनगर- अतुल सावे, पालकमंत्री- संजय शिरसाट
पुणे- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री- अजित पवार
कोल्हापूर- माधुरी मिसाळ, पालकमंत्री- प्रकाश आबिटकर
रत्नागिरी-उदय सामंत, पालकमंत्री- आशिष शेलार
संपर्कमंत्र्यांचे काय काम असणार?
पालकमंत्रिपदाच्या सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संपर्कमंत्री हे नवे पद निर्णाण करुन कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या कामात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून सरकारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचाही सहभाग असावा यासाठी संपर्कमंत्री प्रयत्न करणार आहेत. तसेच, ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही तिथे जाऊन संपर्कमंत्री कार्यकर्त्यांच्या भावना हे संपर्कमंत्री जाणून घेतील.