राज्यात मान्सूपूर्व मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर येत्या काही दिवसांत समुद्रात वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यत वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं मच्छिमारांना खोल समुद्रात मच्छिमारी न करत आपल्या बोटी किनाऱ्यावर दाखल करण्याच्या सूचना मत्स्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, 1 ते 31 जुलैपर्यंत मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी या नियमाचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी दि.1 जून ते 31 जुलै 2025 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग संजय पाटील यांनी केले. तसेच, या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
, 22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्राचे रौद्ररुप पाहायला मिळेल. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा घाट, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर या जिल्ह्यांना येलो अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, पुणे, पुणे घाट, सातारा , सांगली, जालना, परभणी, हिंगोली,नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.