2 कोटींच्या खंडणीसाठी 7 वर्षीय मुलाचं अपहरण...
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात एका नामांकित बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे काल रात्री(दि.04) अपहरण करण्यात आले असून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री 9 वाजता एन 4, सिडको भागात घडली.
विशेष म्हणजे घरापासून 100 मीटर अंतरावरील सेंट्रल मॉल येथून मुलाचे अपहरण झालेआहे. अपहरणकर्ते काळ्या रंगाच्या चारचाकीतून आले अन् वडिलांसमोरच मुलाला उचलून नेले. काही क्षणात हा प्रकार वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी धावाधाव केली मात्र, काहीही उपयोग झाला नाही. पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी तांत्रिक तपास सुरु केला.
कसं झालं अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद....
View this post on Instagram
मंगळवारी रात्री जेवल्यानंतर वडील आणि मुलगा फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. संबंधित मुलगा हा वडिलासोबत सायकल खेळत होता. वडील हे वॉकिंग करीत असताना तो काहीसा मागे राहिला. तेवढ्यात एक कार आली. कारच्या आतील आणि बाहेरील लाईट बंद होत्या. त्यांनी मुलाला जवळ बोलावले. तेवढ्यात मुलगा कारमध्ये जाऊन बसला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता अपहरणकर्ते कारसह उच्च न्यायालयाच्या दिशेने पसार झाले.