प्रातिनिधिक छायाचित्र....
सरकारी अधिकाऱ्यांसह, पुस्तक लेखक, दुकानदारांकडून पैशांचा पाऊस; मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत, विद्यार्थ्यांनी दिली माहिती
Telegram channel, MPSC Student & Caoching classes (पुणे) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून(एमपीएससी) सन २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. या पध्दतीनुसार एमपीएससीने जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवेसाठी जानेवारी महिन्यात जाहिरात प्रसिध्द केली जाणार आहे. ही जाहिरात एकदा का प्रसिध्द झाली की त्यात बदल करता येणार नाहीत. त्यामुळे ही जाहिरात प्रसिध्द करण्यास विरोध करावा तसेच वर्णनात्मक पध्दतीच्या विरोधात वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. यातून एमपीएससी आणि राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी खासगी क्लास चालकांनी टेलिग्राम चॅनेल आणि व्हॉट्सअप चालकांची दलाल म्हणून नेमणूक केली आहे. अशी धक्कादायक खुलासा अनेक विद्यार्थ्यांनी सीविक मिररशी संपर्क साधून केला.
पुणे शहरासह राज्यात स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या खासगी क्लासेसची मोठी संख्या वाढली आहे. या क्लास चालकांनी मिळून एक दबाव गट तयार केला आहे. जे विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करत होते. त्यातीस अनेकांनी टेलिग्राम चॅनेल तसेच व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले आहेत. सुमारे १२५ हून अधिक ग्रुप तयार करण्यात आलेले आहे. एका टेलिग्राम चॅनेलमध्ये जवळपास एक ते दीड मुले आहेत. या चॅनेल अथवा ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांविषयी माहिती, अभ्यासक्रम, चालू घडामोडी आदींची माहिती दिली जात होती. परंतु वाढत्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, खासगी क्लास चालकांची जाहिराती या ग्रुपवर करण्यास सुरवात करण्यात आली. एका दिवसासाठी जाहिरात देयची असल्यास कमीत कमी ५ हजार रुपये आकारले जातात. ज्या ग्रुपमध्ये विद्यार्थी संख्या अधिक त्या ग्रुपवर जाहिरातींचा ओघ मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या ग्रुपमध्ये जाहिरात देण्यासाठी क्लास चालक महिना दोन महिने प्रतिक्षेत असतात. दर महिन्याला लाखात उत्पन्न मिळत असल्याचे या ग्रुप आणि चॅनेल चालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. अर्थात जाहिरातीतून पैसे कमावणे हे चुकीचे नाही. तो त्यांचा अधिकृत व्यावसाय असल्यास त्याला विरोध नाही. मात्र याच गौरफायदा घेतला जात आहे. ग्रुप आणि चॅनेल चालकांना पैशांचे आमिष दाखवून हे खासगी क्लास त्यांचा हेतू साध्य करत आहेत. एमपीएससीवर आणि राज्य सरकारवर दबाव आणत आहे. तसेच सरकारी सेवेत वर्ग दोन च्या पादवर कार्यरत असलेली अधिकारी ज्यांना वर्ग एकचे पद हवे आहे, असे अधिकारी मिळून एकत्रित पैसे गोळा करुन आंदोलनकर्त्यांना देण्याच्या तयारीत आहेत. अशी धक्कादायक माहिती विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली.
एमपीएससीच्या विद्यार्थी त्यांच्या मागणीसाठी अनेकवेळा रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या योग्य मागण्या सरकारने देखिल मान्य केल्या आहेत. परंतु एखादी परीक्षा पुढे ढकल्यास मिळणाऱ्या वेळातून खासगी क्लास चालकांना धंदा करण्याची संधी मिळते. त्यातून काही विद्यार्थी संघटना उदयास आल्या. तसेच काही विद्यार्थ्यांचे नेते, आंदोलनकर्ते यांची आर्थिक गणिते साधण्यासाठी याच खासगी क्लास चालकांनी आर्थिक रसद पुरवण्यास सुरवात केली. एकदा तोंडाला रक्त लागले की त्याचे उपद्रव मुल्य वाढते, त्याच प्रमाणे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. ही गोष्ठ लक्षात घेवून गेल्या काही काळात झालेली मोठी आंदोलने ही आर्थिक हितसंबंधातूनच झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे आता खरच गरज असलेल्या विद्यार्थ्यांना आंदोलनाचा फटका बसत आहे. यात राजकीय पक्षांनी देखिल विद्यार्थ्यांचा वापर करुन घेतला आहे. तसेच पक्षांच्या काही नेत्यांनी थेट आंदोलनात सहभागी होत एमपीएससीवर दबाव आणला होता. त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या आंदोलनामध्ये आंदोलनकर्ते हे खरच स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत का, त्यांची किती परीक्षा दिल्या असून विविध टप्प्यांवर यश मिळवले आहे का, याची तपासणी करुनच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास परवानगी द्यावी, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
MPSC Recruitment : पीएसआय गुणोत्तर प्रमाण वाढवा, विद्यार्थ्यांची एमपीएससीकडे मागणी....#MPSC #PSI @mpsc_office https://t.co/2wI1rB1ErY
— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) January 20, 2025
दरम्यान, पुस्तक लेखक, प्रकाशक आणि खासगी क्लासचालकांची बहुपर्यायी पध्दतीनुसारची पुस्तके, नोट्स बाजारात प्रसिध्द आहेत. वर्णनात्मक पॅटर्न लागू झाल्यानंतर हा धंदा बुडण्याची शक्यता आहे. एवढ्या वर्षात बसलेली क्लासचे बस्तान उठणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हाताशी धरुन दबाव तंत्र वापरण्याचा उद्योग केला जात आहे. यावर राज्य सरकारने वेळीच आवर घालावा, अन्यथा परिस्थिती चिघळू शकते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांना चेतवण्याचे काम सुरु....
विविध टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्यसेवा वर्णनात्मक पध्दतीला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांना चेतवण्याचे काम सुरु केले आहे. मोठे आंदोलन उभारण्यासाठी तयार राहा अशा सूचना दिल्या जात आहेत. एमपीएससीने जानेवारी महिन्यात राज्यसेवा परीक्षेची जाहिरात प्रसिध्द करु नये, यासाठी जमेल तसा विरोध करा असे स्पष्ट सांगितले जात आहे. ही गोष्ट समोर आल्यानंतर शहरातील एका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी काही टेलिग्राम चालकांना चांगलीच परेड घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आंदोलनाला खतपाणी घालणाऱ्यांवर पोलिसांकडून तसेच राज्य सरकारकडून धडा शिकवला जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.