c आला आहे. संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या कायद्याचा पहिला बळी मीच म्हणत खंत व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
मनी लॉडरिंग प्रतिबंधक कायदा म्हणजे माजी मंत्री पी. चिदंबरम यांचे पाप आहे असं विधान भुजबळ यांनी केलं. पीएमएलए हा कायदा 2002 मध्ये करण्यात आला. त्यावेळी त्यात ए आणि बी दोन भाग होते. ए मध्ये जामीन मिळत नव्हत आणि बी मध्ये जामीन मिळत होता. मात्र, 2013 मध्ये पी चिदंबरम यांनी दोन्ही कायदा एकत्र केला. अरुण जेटली आणि शरद पवार यांनी विरोध केला पण चिदंबरम यांनी ऐकलं नाही.
या कायद्यातील नवीन सुधारीत तरतुदीमुळे माझी अडीच वर्षे तुरुंगात गेल्याची खंत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली. पुढे भुजबळ म्हणाले, आपल्याविरोधात काहीच पुरावे सापडले नाहीत. त्यामुळं मी सुटलो. पण आयुष्यातील अडची वर्ष तुरुंगात गेली आणि प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. अशा शब्दात भुजबळांनी मनातील दुःख बोलून दाखवलं.
यासोबतच ते पुढे म्हणाले, चिदंबरम यांचा मुलगा कार्तिक, त्यानंतर स्वतः चिदंबरम यांनाही या कायद्याचा फटका बसला. चिदंबर या भिंतीवरुन त्या दारावरुन पाठी मागून उड्या मारत होते आणि पळत होते हे सर्व आम्ही पाहिलं आहे. तुम्ही स्वतःला मोठे वकील समजतात. भविष्यामध्ये त्याचा उपयोग किती दुरुपयोग किती याचा विचार करुनच कायदे करायला पाहिजे. असा टोलाही भुजबळ यांनी चिदंबरम यांना लगावला.