Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या आंध्रप्रदेशच्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात; ३५ जण जखमी तर ३ गंभीर

बुलढाणा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या मलकापूर-नांदुरा दरम्यानच्या काटी फाट्याजवळ आंध्रप्रदेशच्या भाविकांची बस उभ्या ट्रकला धडकली असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Sunil Chavan
  • Fri, 18 Apr 2025
  • 12:39 pm
pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

सग्रहीत छायाचित्र

बुलढाणा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या मलकापूर-नांदुरा दरम्यानच्या काटी फाट्याजवळ आंध्रप्रदेशच्या  भाविकांची बस उभ्या ट्रकला धडकली  असल्याची माहिती समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी फाट्या जवळ रात्री ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली असून या अपघातात जवळपास  ३५ भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्र.५६ वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी फाट्या जवळ रात्री ३ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली असून या अपघातात जवळपास ३५ भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे हे विभागीय गस्तीवर असताना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.जखमींना उपचारासाठी मलकपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर १० जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे पाठवण्यात आला. हे भाविक आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक, शिर्डीला देवदर्शानासाठी जात होते. 

Share this story

Latest