रक्तदान चळवळीला मिळाली गती

अपघातांची वाढती संख्या आणि दुर्धर आजारामुळे रक्तपेढीतील रक्तसाठ्यांचा तुटवडा वाढला आहे. त्याची दखल घेत पाच वर्षांत रक्तदानाच्या चळवळीला गती मिळाली असून रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 17 Jun 2025
  • 01:08 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune Newsz

संग्रहित छायाचित्र

राज्यात गेल्या वर्षी २१ लाखांहून अधिक दात्यांनी दिले रक्त; पुण्यात सर्वाधिक रक्तदान, त्यानंतर मुंबई, ठाणे आणि सोलापूरचा नंबर

अपघातांची वाढती संख्या आणि दुर्धर आजारामुळे रक्तपेढीतील रक्तसाठ्यांचा तुटवडा वाढला आहे. त्याची दखल घेत पाच वर्षांत रक्तदानाच्या चळवळीला गती मिळाली असून रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी राज्यात २१ लाखांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुण्यात सर्वाधिक रक्तदान झाले असून, त्यानंतर मुंबई, ठाणे आणि सोलापूर या जिल्ह्यांचा क्रमांक आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली या जिल्ह्यात रक्तदानाची संख्या कमी आहे.

अनेक सेवाभावी संस्था, शाळा-महाविद्यालये यांनी वर्षभरात रक्तदान शिबिरे घेतली. त्यामुळे शहरातील रक्तपेढ्यांना मोठा आधार मिळाला. काही वर्षांपूर्वी रक्तदान हे पेड स्वरूपात केले जायचे. रक्तदात्याला दानाच्या बदल्यात काही ठरावीक रक्कम दिली जायची. मात्र, ही प्रथा काळाच्या ओघात मोडीत निघाली. केंद्रीय रक्तसंक्रमण परिषदेनेदेखील त्यावर बंधने घातली. त्यामुळे एखाद्याला आमिष दाखवून रक्तदान करण्यावर अंकुश आला. त्यानंतर रिप्लेसमेंट स्वरुपातील रक्तदानाचा पर्याय पुढे आला. ज्याला ज्या रक्तगटाची गरज आहे, त्याने या बदल्यात अन्य गटाचे रक्तदान केले तर त्याला रक्तदानाचा फायदा मिळतो. अनेक शहरांमध्ये आजही देवाणघेवाणीची ही प्रथा सुरू आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये स्वयंसेवी रक्तदान अर्थात कुठलाही मोबदला न घेता निरपेक्ष रक्तदानाची प्रथा सुरू झाली. ही प्रथा कायम राहावी आणि रक्तदानाच्या चळवळीला गती मिळावी, रक्ताचा मुबलक पुरवठा सरकारी रक्तपेढ्यांमध्ये असावा यासाठी सरकारने स्वेच्छा रक्तदानाला प्रोत्साहन दिले आहे.

गेल्या वर्षभरात राज्यात ३५,८१२ रक्तदान शिबिरे घेण्यात आली. या शिबिरातून २१ लाख ६८ हजार ४३१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे. पुणे, मुंबई रक्तदात्यांनी संख्या अधिक असली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली या जिल्ह्यात रक्तदानाची संख्या कमी आहे. यावर्षी सहा महिन्यात ९ लाख ५० हजार रक्तदात्यानी रक्तदान केले आहे. सुदृढ आरोग्यासाठी रक्तदान करणे फायदेशीर आहे. कारण आपल्या शरीरात ४.५.-५ लिटर रक्त असते. त्यापैकी केवळ ३०० मिली रक्त घेतले जाते. रक्तदानानंतर दोन ते तीन दिवसात शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात. म्हणजेच रक्तदानामुळे नवीन रक्तपेशी तयार होण्यास वाव मिळतो. त्यामुळे आरोग्य सदृढ राहते.

२०२४ मध्ये जिल्हानिहाय रक्तदाते

 

 

शहर -- रक्तदान शिबिर -- रक्तदाते

पुणे -- ४,४६१ -- ३,४५,९४८

मुंबई -- ३,५९६ -- ३,२३,७४१

सोलापूर -- २,२७९ -- १,८६,३९३

ठाणे -- १,७७३ -- १,४३,३८४

कोल्हापूर -- १,३७८ -- ९६,४०५

गुजरात -- --

मुंबई -- --

दिल्ली -- --

पंजाब -- --

बंगळुरु -- ८ --

वर्ष--  रक्तदान शिबिर -- जमा झालेले युनिट

२०२४ -- ३५,८१२ -- २१,६८,४३१

२०२३ -- ३३,८०७ -- २०,४४,९५७

२०२२ -- ३४,६७७ -- १९,२८,२४७

२०२१ -- २८,९२६ -- १६,७३,९४७

२०२० -- २६,१०४ -- १५,४६,८०५

गुजरात -- ८ --

मुंबई -- ७ --

दिल्ली -- ८---

पंजाब -- ८ --

बंगळुरु -- ८ --

Share this story

Latest