Ladaki Bahin Yojana : बांगलादेशी महिलेने घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, वाचा कुठे घडला हा प्रकार

महाराष्ट्रातील अपात्र महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु आहे. यामुळे अनेक महिला अपात्र होण्याची शक्यता असतांनाच आता परदेशातील महिलेने या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बांगलादेशी महिलने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असून मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही बाब उघड झाली आहे. पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला अटक करण्यात आली असून अटक केलेल्यांपैकी एका महिलेने लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्याचे उघड झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 23 Jan 2025
  • 07:25 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहीत छायाचित्र

मुंबई : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी  मंत्री आदिती तटकरे यांनी सुरु केली आहे. निकक्षांमध्ये अपात्र ठरत असलेल्या महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे एका बांगलादेशी महिलेने योजनेचा लाभ घेतला असल्याची  बाब समोर आली आहे.

महाराष्ट्रातील अपात्र महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु आहे. यामुळे अनेक महिला अपात्र होण्याची शक्यता असतांनाच आता परदेशातील महिलेने या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बांगलादेशी महिलने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असून मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही बाब उघड झाली आहे. पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला  अटक करण्यात आली असून अटक केलेल्यांपैकी एका महिलेने लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्याचे उघड झाले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. दक्षिण मुंबईतील कामठीपुरा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बनावट कागदपत्र तयार करुन या बांगलादेशी महिलेने योजनेचा लाभ घेतला आहे. बांगलादेश भारत बॉर्डरवरुन अनेक बांदलादेशी भारतामध्ये येत आहेत. बांगलादेशमध्ये अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले असून नोकरीसाठी अनेकजण घुसखोरी करत आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान याच्यावर देखील हल्ला करणारा व्यक्ती बांगलादेशी असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला देखील बांगलादेशी आहे.

भारतामध्ये घुसखोरी करणारे बांगलादेशी हे दलालाच्या मदतीने भारतामध्ये प्रवेश करतात. तसेच बनावट कागदपत्र व ओळखपत्र तयार केली जातात. याद्वारे ते भारताचे नागरिक असल्याचा बनाव करतात आणि देशामध्ये वावर करतात. मात्र यामुळे देशातील कायदा व व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच बनावट कागदपत्रांचा वापर करुन राज्य सरकारच्या महत्त्वकांशी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.

Share this story

Latest