पुणे : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बोटाला झालेल्या जखमेवरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चाकणकरांच्या दाव्यानुसार त्या २ तारखेला अजित पवारांच्या दौऱ्यात होत्या, तर त्यांचे कार्यकर्ते एका आरतीच्या कार्यक्रमात दरवाजा लागून जखम झाल्याचे सांगत आहेत.
या परस्परविरोधी दाव्यांवरून अंधारे यांनी ‘भोंदू’ बाबा अशोक खरात आणि ईशान्येश्वर प्रकरणाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. विशेष म्हणजे, खासदार सुनील तटकरे यांच्या बोटाला झालेली जखमदेखील अशाच ‘योगायोगाने’ झाल्याचे सांगत अंधारे यांनी सरकारमधील नेत्यांच्या कथित संबंधांवरून सडकून टीका केली आहे.
सुषमा अंधारे यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, “चाकणकरांचा कार्यकर्ता सांगत आहे की ताईंच्या दरवाज्यात बोट अडकून जखम झाली. ताई आमच्याकडे त्यादिवशी आरतीला आल्या होत्या पण काय गंमत आहे की चाकणकर स्वतः सांगतात दोन तारखेला त्या अजितदादांच्या दौऱ्यामध्ये होत्या काय खरं काय खोटं ईशान्येश्वराला आणि खरातांनाच माहिती ..! पण हा किती मोठा योगायोग आहे की तटकरेंच्या बोटाला झालेली जखम सुद्धा दरवाजात अडकूनच झाली.


