Pune: अजितदादांच्या आमदाराचा कारनामा; विधानसभा जिंकली म्हणून हत्तीवरून वाटले पेढे अन् वन विभागाकडून दाखल झाला गुन्हा

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे यश साजरं करण्यासाठी पिरंगुटमध्ये अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांनी हत्तीवरुन मिरवणूक काढली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Wed, 5 Feb 2025
  • 05:59 am
AJit Pawar,Pune News,NCP,Shankar Mandekar,AJit Pawar,Pune News,NCP,Shankar Mandekar

Shankar Mandekar

पुण्यातल्या भोर विधानसभा मतदारसंघातून मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभा जिंकला म्हणून हत्तीवरून अजित पवार गटाच्या आमदाराने पेढे वाटले पण वनविभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे यश साजरं करण्यासाठी पिरंगुटमध्ये अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांनी हत्तीवरुन मिरवणूक काढली होती. त्याच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने शंकर मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या तासगाव गणपती पंचायतन संस्थांन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे. शंरक मांडेकरांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री पिरंगुट येथे मांडेकर यांची हत्तीवर मिरवणूक काढली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी घेतली आहे. 

विधानसभा निवडणुकीत मांडेकर विजयी होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट सांगलीवरुन मिरवणुकीसाठी हत्ती मागवला होता.  मांडेकर आमदार झाले यासाठी या हत्ती वरुन पेढे वाटण्यात आले.  मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा ठरत असल्याने वन विभागाने कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी मिरवणुकीचे आयोजक राहूल बलकवडे यांच्यासह हत्ती ज्यांच्या मालकीचा आहे, त्या तासगाव गणपती पंचायतन संस्थांन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी वन विभागाचे पथक हा हत्ती सध्या जिथे आहे, त्या सांगली जिल्ह्यातील तासगावला जाणार आहे.

शंकर मांडेकर यांनी या मिरवणुकीचा व्हिडीओ त्यांच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. 'भोर - राजगड - मुळशी मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल उरवडे,आंबेगाव, बोतरवाडी, मारणेवाडी, गाडेवाडी, कांजणेनगर, शेलारवाडी, काळभोरवाडी,चोरघेवाडी, बलकवडेवाडी, गवळीवाडा व पंचक्रोशीतील मधील ग्रामस्थ मंडळींनी माझी अभूतपूर्व अशी हत्तीवरून मिरवणूक काढत सुमारे १२५ किलो पेढे वाटले. ह्या सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर व्यक्त केलेले प्रेम मी कदापि विसरू शकत नाही. माझ्या वर नागरिकांनी टाकलेला विश्वास हा माझ्या कामातून सिद्ध करून दाखवीन हा विश्वास मी देतो. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील माझ्या माय - बाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो..''अशी भावना त्यांनी व्हिडीओ शेअर करताना व्यक्त केली आहे.

 

Share this story

Latest