World Heritage Day 2025 | आज जागतिक वारसा दिन...! जाणून घ्या, भारतासह महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांची यादी....

भारतात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत एकूण 43 ठिकाणांचा समावेश आहे. त्यामध्ये पाच ठिकाणे ही महाराष्ट्रात आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Fri, 18 Apr 2025
  • 03:34 pm
Maharashtra news,Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune,

World Heritage Day 2025 (International Day For Monuments and Sites)

World Heritage Day 2025 | दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या जतनाबद्दल जागरूकता पसरवणे आहे. हा दिवस आपल्याला आपल्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व आणि ते जतन करण्याची जबाबदारी लक्षात आणून देतो.

राज्याच्या दृष्टीने त्याची संस्कृती आणि नैसर्गिक विविधता ही त्याला एक वेगळी ओळख निर्माण करुन देत असते. ते पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येत असतात. त्यातही राज्यातील ठिकाणं ही जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असतील तर त्याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. आपल्या देशात एकूण 43 ठिकाणांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच ठिकाणांचा समावेश आहे. UNESCO च्या संकेतस्थळावर ही यादी पहायला मिळते. डिसेंबर 2024 पर्यंत, भारतात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत एकूण 43 ठिकाणांचा समावेश आहे. यापैकी 35 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक, आणि 1 मिश्रित (सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही) स्थळे आहेत.

महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे  (World Heritage Sites In Maharashtra) :

आपल्या देशात एकूण 43 ठिकाणांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच ( 1. Ajanta Caves (अजिंठा लेणी),2. Ellora Caves (एलोरा लेणी), 3. Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस),  4. Elephanta Caves (एलिफंटा लेणी), 5. The Victorian and Art Deco Ensemble (व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल)) या ठिकाणांचा समावेश आहे. 

1. अजिंठा लेणी (Ajanta Caves): स्थान: औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र.

वैशिष्ट्य: प्राचीन बौद्ध लेणी, उत्कृष्ट चित्रकला आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध. इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन 6वे शतक याकालावधीतील.

2. वेरूळ लेणी (एलोरा लेणी) (Ellora Caves) : स्थान: औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र.

वैशिष्ट्य: हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीय लेणी, 5व्या ते 10व्या शतकातील. कैलास मंदिर हे येथील प्रमुख आकर्षण.

3. एलिफंटा लेणी (Elephanta Caves) स्थान : मुंबईजवळील घारापुरी बेट.

वैशिष्ट्य: मध्ययुगीन खड्ड्यात कोरलेली शिव मंदिरे आणि शिल्पकला, 5व्या ते 8व्या शतकातील.

4. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थान: मुंबई. : भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ज्याला व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हिटी) किंवा सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाते. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेक सुवर्णजयंतीच्या निमित्ताने इसवी सन 1887 मध्ये याची निर्मिती झाली. 

5. व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल (The Victorian and Art Deco Ensemble) स्थान: मुंबई. | व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ बॉम्बे हा मुंबईच्या किल्ल्या परिसरात 19व्या शतकातील व्हिक्टोरियन रिव्हायव्हल सार्वजनिक आणि 20व्या शतकातील मुंबई आर्ट डेको खाजगी इमारतींचा संग्रह आहे. या जोडणीला 2018 मध्ये UNESCO जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.

भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे (35) खालीलप्रमाणे....

1.अजिंठा लेणी  

2.वेरूळ (एलोरा) लेणी  

3.आग्रा किल्ला  

4.ताजमहाल  

5.कोणार्क सूर्य मंदिर  

6.महाबलीपुरम स्मारक समूह  

7.फत्तेपूर सिक्री  

8.हंपी स्मारक समूह  

9.खजुराहो स्मारक समूह  

10.एलिफंटा लेणी  

11.पट्टडकल स्मारक समूह  

12.चोल मंदिरे (तंजावूर, गंगैकोण्डचोलपुरम, दरासुरम)  

13.कुतुब मिनार आणि स्मारके  

14.सांची येथील बौद्ध स्मारके  

15.हुमायूँचा मकबरा  

16.महाबोधी मंदिर परिसर  

17.भीमबेटकातील खड्ड्यातील आश्रयस्थाने  

18.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)  

19.लाल किल्ला परिसर  

20.जंतर मंतर, जयपूर  

21. जयपूर शहर  

22.रामप्पा मंदिर  

23.धोलावीरा: हडप्पा संस्कृतीचे शहर  

24. संतिनिकेतन  

25.होयसळ मंदिरे  

26. चंपानेर-पावागड पुरातत्त्व उद्यान  

27.राणी-की-वाव  

28.नालंदा महाविहार  

29.कॅपिटोल कॉम्प्लेक्स, चंदीगड  

30.विक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको बांधकाम, मुंबई  

31. बुद्ध मंदिर, सातधारा  

32.मध्ययुगीन दिल्लीतील पुरातत्त्व स्थळ  

33.मांडू येथील स्मारक समूह  

34.मराठा सैन्य स्थापत्य  

35.काशी विश्वनाथ मंदिर परिसर

मिश्र विभागातील स्थळ (1)

कांचनगंगा नॅशनल पार्क- सिक्किम, 2016

नैसर्गिक जागतिक 7 वारसा स्थळांची यादी (ठिकाण, नोंदणीचे वर्ष))

1.काझिरंगा नॅशनल पार्क- आसाम 1985

2.केवलागदेव-घाना नॅशनल पार्क- राजस्थान 1985

3.मानस वाईल्डलाईफ सॅन्चुरी- आसाम, 1985

4. नंदा देवी आणि फुलांचे खोरे राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड, 1988,2005

5.सुंदरबन नॅशनल पार्क- पश्चिम बंगाल, 1987

6.पश्चिम घाट- महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ, 2012

7. ग्रेट हिमालयीन नॅशनल पार्क- हिमाचल प्रदेश, 2014

Share this story

Latest