संग्रहित
एटीएम वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण रिझर्व्ह बँक एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम लवकरच बदलणार आहे. हिंदू बिझनेसलाईनच्या अहवालासून ही माहिती समोर आली आहे.
. हिंदू बिझनेसलाईनच्या अहवालानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 5 मोफत व्यवहार मर्यांदा संपल्यानंतर कमाल रोख व्यवहार शुल्क हे सध्याच्या 21 रुपये प्रति व्यवहारावरून 22 रुपये वाढवण्याची शिफारस केली आहे. त्यामुळं आता 5 ट्रान्झॅक्शनंतर प्रत्येक कॅश विड्रॉलसाठी 22 रुपये एटीएम वापरकर्त्यांला मोजावे लागणार आहेत. यासोबतच, एनपीसीआयने रोख रक्कमेच्या व्यवहारासाठी एटीएम इंटरचेंज फी 17 रुपयांवरुन 19 रुपये करण्याची शिफारस केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँक आणि व्हाइटृलेबल एटीएम ऑपरेटर मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये शुल्क वाढवण्याच्या शिफारशीशी सहमत आहेत. पण सध्या यासंदर्भात अधिकृत माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि एनपीसीआयने दिलेली नाही.