Sexpert and Psychiatrist : सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

डॉ रोहन जहागीरदार (मानसोपचार तज्ज्ञ आणि तज्ज्ञ)

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 6 Jun 2023
  • 04:08 pm

सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

मी आता ४० वर्षांचा आहे. मध्यंतरी मी शरीर अधिक बळकट करण्यासाठी काही प्रोटिन्स आणि वेगवेगळ्या गोळ्या, पावडर घेत होतो. मात्र, नंतर याचा परिणाम माझ्या लैंगिक जाणिवांवार होतो आहे की काय, असे मला वाटले. लिंगाला ताठरता येण्यास अडचणी येऊ लागल्याचे मला जाणवत आहे. हे कशामुळे झाले असेल?

- डॉक्टरांचा सल्ला न घेता अशा प्रकारच्या गोळ्या किंवा पावडरचे सेवन केल्याने अशी समस्या निर्माण होऊ शकते. अशा प्रकारच्या अॅन्टिबायोटिक्सचा परिणाम तुमच्या कामेच्छेवर आणि कार्यक्षमतेवर होऊ शकतो. लिंगामध्ये ताठरता येण्यास अडचण होणं, हा त्याचाच भाग आहे. तुम्ही तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही घेत असलेले प्रोटिन्स, पावडर वगैरे घेणं बंद करा. काळजी करू नका. डॉक्टरांच्या औषधोपचाराने सर्व काही पूर्ववत होईल.

मी आता ३० वर्षांची आहे. मासिक पाळीच्या काळात माझ्या स्तनांचा आकार वाढतो आणि ते थोडे अधिक सुडौल वाटू लागतात. मात्र, त्या चार दिवसांनंतर त्यांच्यात पुन्हा शिथिलता येते. ते मला अजिबात आवडत नाही. ते सतत तसेच राहावेत, यासाठी काही करता येईल का?

-  शरीरात होणाऱ्या अंतर्गत बदलांमुळे आणि हार्मोन्समुळे स्तनांचा आकार बदलतो. हा बदल मासिक पाळीच्या काळात विशेषत्वाने होतो. त्यामुळे तो बदल म्हणून घ्यायला हवा. स्तनांचा आकार मोठा करणं किंवा त्यांच्यातली शिथिलता जाऊन ते अधिक कठीण करणं, या गोष्टी शस्त्रक्रियेद्वारे, औषधांद्वारे करता येतात. मात्र, त्याचे काही दुष्परिणामही असू शकतात. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य ते करा. जे नैसर्गिकदृष्ट्या जसं आहे, ते तसंच राहू द्यावे, असा सल्ला मी तुम्हाला देईन.

मी ३० वर्षांचा आहे. याआधी माझे क्वचितच शरीरसंबंध प्रस्थापित झाले आहेत. तरीदेखील माझ्या लिंगाच्या त्वचेवर रेषा पडलेल्या दिसतात. असे का झाले असेल?

- अॅलर्जीमुळे असं होऊ शकतो. त्वचेचा काही आजार असल्यासही असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष न करता. तत्काळ डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घेऊ लागा. याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकते.

मी आता ५० वर्षांची आहे. माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं की, पन्नाशीनंतरही कामेच्छा आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी तिने अधिक प्रमाणात सेक्स करणं सुरू केलं. यात काही तथ्य असू शकतं का?

- नियमित सेक्स करण्याने तोटा काहीच नाही. त्यामुळे उत्साह वाटतो. मन व शरीर प्रसन्न राहतं, हे खरं. मात्र, पन्नाशीनंतर अधिक प्रमाणात असं काही केल्याने वयाचा भाग जाणवणार नाही, असं होत नाही. वय वाढत राहणार आणि वयानुसार त्या त्या गोष्टी जाणवणारच. ते आपण स्वीकारायला हवं. त्याचा त्रास करून न घेता आनंदाने तुमचं कामविश्व अनुभवा.

लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story