सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

डॉ रोहन जहागीरदार (मानसोपचार तज्ज्ञ आणि तज्ज्ञ)

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 3 Jun 2023
  • 12:53 pm

सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

1) मी २८ वर्षांची स्त्री आहे. सेक्सनंतर काही काळ योनीमार्ग प्रसरण पावल्याचे मला जाणवते. सेक्सदरम्यान असं होणं स्वाभाविक आहे. मात्र, सेक्सनंतरही काही काळ तसेच वाटते. सामान्यतः असे होते का?

- सेक्सदरम्यान असं होणं स्वाभाविक आणि अपेक्षित आहे. मात्र, सेक्सनंतरही काही काळ असे होत असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. बऱ्याचदा शरीरात झालेल्या बदलांमुळे योनीमार्ग पुन्हा आधीसारखा व्हायला वेळ लागू शकतो. त्यामुळे काळजी करू नये, परंतु तुम्हाला तिथे जळजळ होत असेल किंवा काही त्रास होत असेल, तर लगेच डॉक्टरांशी बोला आणि त्यांचा सल्ला घ्या.

2) मी ३० वर्षांचा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मला पाठदुखीचा त्रास होतो आहे आणि त्यासाठी मी पेनकिलर घेतल्या आहेत. मात्र, दोन आठवड्यांपासून मला असे लक्षात आले आहे की, माझ्या लिंगाचा ताठरपणा कमी होत आहे. या दोन गोष्टी एकमेकांशी संबंधित असू शकतात का?

- तुम्ही किती प्रमाणात पेनकिलर घेतल्या आणि त्याचा डोस किती होता, यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. मात्र, या दोन गोष्टी एकमेकांशी संबंधित असू शकतात. त्यामुळे आवश्यकता वाटत नसल्यास आता पेनकिलर घेणे थांबवा आणि तत्काळ डॉक्टरांशी संपर्क सांधून त्यांना तुमची समस्या सांगा.

3) मी ३९ वर्षांची महिला आहे. शरीरसंबंधांमधील तीच ती कृती आणि तीच क्रिया करण्याचा मला प्रचंड कंटाळा आला आहे. यावर काय उपाय असू शकतो?

- तुम्ही आता चाळिशीच्या उंबरठ्यावर आहात. या वयात असं वाटणं अत्यंत साहजिक आहे. मात्र, आता बदलता काळ आणि तंत्रज्ञान यामुळे गोष्टी खूप बदलल्या आहेत. तुम्ही स्वतः इंटरनेटवर विविध प्रकारची माहिती घेऊ शकता आणि त्याद्वारे अनेक गोष्टी जाणून घेऊ शकता. परंतु, इंटरनेटवर काहीही वाचताना किंवा पाहताना ते संकेतस्थळ फेक नाही ना, याची खातरजमा अवश्य करून घ्या.

4) मी माझ्या ओळखीतल्याच मुलाशी लग्न केलं आहे. आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. अलीकडे त्याच्या वागण्यात मला काही बदल झालेले जाणवतात. तो माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम करत नाही. असे का होत असेल?

- तुम्ही तुमच्या ओळखीच्या मुलाशी लग्न केलं ही आनंदाची गोष्ट आहे. यामुळे नातं अधिक घट्ट होतं. मात्र, तुम्ही आता वयाने मोठ्या झाल्या आहात आणि तुमचा लहानपणीचा मित्रही मोठा झाला आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे त्याच्या वागण्यात बदल झाला असेल. तुम्ही त्याच्याशी मोकळेपणाने बोला आणि त्याला तुमची अडचण सांगा. 

लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story