Benefits Of Drinking Coffee
Benefits Of Drinking Coffee | कॉफी आणि चहा हे दोन्हीही जगभरात सर्वात जास्त लोकप्रिय असे पेय आहेत. बहुतेक लोकांची सकाळ ही कॉफी किंवा चहा पिऊन सुरू होते. तथापि, अनेक वेळा आरोग्य तज्ञ म्हणतात की, "कॉफी किंवा चहा रिकाम्या पोटी पिऊ नये कारण त्याचे काही दुष्परिणाम होतात. तथापि, माफक प्रमाणात म्हणजेच योग्यवेळी सेवन केल्यास, तुम्हाला दोन्ही पेयांचे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
अशातच, एका नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, जर आपण सकाळी कॉफी प्यायली तर ते तुमचे आयुष्य वाढू शकते. चला तर जाणून घेऊया, या संशोधनातून काय महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
संशोधनातून काय आलं आहे समोर..?
दरम्यान, साल 1999 ते 2018 या कालावधीत पोषण तपासणी सर्वेक्षणाद्वारे 40,725 लोकांवर हे संशोधन करण्यात आले आहे. खरं तर, या संपूर्ण कालावधीत, संशोधन पथकाने सर्व लोकांच्या दैनंदिन आहाराची आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाची गणना केली आहे. दर आठवड्याला त्यांची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये त्यांना असे आढळून आले की सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी सकाळी कॉफी प्यायल्यास त्यांचे आयुष्यमान 16% ने वाढले. त्याच वेळी, जर दिवसाच्या इतर कोणत्याही वेळी कॉफी घेतली तर त्याचे काही तोटे देखील दिसून आले आहेत.
आणखी काय समोर आलं....?
व्हिओन मध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, सकाळी कॉफी पिणाऱ्या लोकांना कार्डिओ समस्यांचा धोका कमी असतो. त्याच वेळी, दिवसाच्या कोणत्याही वेळी कॉफी पिणाऱ्यांमध्ये असे कोणतेही निरोगी बदल दिसून आलेले नाहीत. तथापि, या संशोधनात असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही की, जर तुम्ही सकाळी कॉफी प्यायली तर तुम्हाला हृदय किंवा हृदयरोगाचा त्रास होणार नाही किंवा त्यामुळे मृत्यू होणार नाही. याची पुष्टी करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.
जाणून घ्या, दररोज सकाळी कॉफी पिण्याचे फायदे....
1.दररोज 1 कप कॉफी प्यायल्याने ऊर्जा वाढते.
2.कॉफी पिल्याने तुमचे लक्ष केंद्रित (एकाग्रता) होते आणि तुमचे मन शांत राहते.
3.कॉफी पिल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात.
4.कॉफी वजन कमी करण्यास देखील मदत करते.
5.कॉफीचे सेवन केल्याने रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित राहतो.
Disclaimer: वर दिलेल्या माहितीनुसार कृती करण्यापूर्वी, कृपया तज्ञांचा सल्ला घ्यावा. civic mirror याद्वारे कोणताही दावा करत नाही.