वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. उष्णता वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात डिहायड्रेशन, अपचन आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात रोजच्या आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीर कायम थंड राहतं. बऱ्याचदा शरीराची प्रक्रिया बिघडल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
शरीरात उष्णता वाढल्यानंतर सगळ्यात आधी तळपायांमध्ये जळजळ होते आणि पायांमध्ये वेदना होतात. अशावेळी पायांना मेंहदी लावावी. पायांना मेहंदी लावल्यामुळे तळपायांमध्ये होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी होऊन जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तळपायांना किंवा हातांना तुम्ही मेहेंदी लावू शकता. यामुळे मेहंदी शरीरात वाढलेली सर्व उष्णता बाहेर काढून टाकते आणि शरीर निरोगी राहते. मेंहदी त्वचेमधून थेट स्नायूंवर आणि नाड्यांवर परिणाम करते ज्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. मेहंदी लावल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.