ChatGPT ला टक्कर देणारं Deepseek नक्की आहे तरी काय? सगळीकडं का होत आहे चर्चा
जगभरात आर्टिफिशियल इंटेलीजन्सची चर्चा सुरू आहे. एकीकडे अमेरिकेसारखी महासत्ता आर्टिफिशियल इंटेलीजन्सच्या क्षेत्रात वर्चस्व गाजवतान दिसत आहे. त्या सोबतच चीन सुद्धा या स्पर्धेत मागे नाही.
चीनच्या DeepSeek नावाच्या एका स्टार्ट अपने एक deepseek R1 आणि R1 Zero हे नवीन एआय मॉडेल लॉन्च केले आहे. या मॉडेलची जगभरात चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ओपन एआय या कंपनीने चॅट जीपीटीसारखे टूल बाजारात आणले. त्यानंतर मेटा किंवा गुगलचे जेमीनी यांसारखे एआय टूल्स बाजारात आले. त्यामुळे इतर क्षेत्रात वर्चस्व राखणारी अमेरिका आता आर्टिफिशियल इंटेलीजन्सच्या क्षेत्रात देखील वर्चस्व राखणार असे वाटत होते आणि तसे आहे देखील. मात्र चीनने या स्पर्धेत मोठी आघाडी घेतली आहे. चीनच्या Baidu किंवा अलीबाबा यांसारख्या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलीजन्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
DeepSeek काय आहे?
DeepSeek हा एक स्टार्टअप उद्योग आहे. या कंपनीचे मुख्यालय हे चीनच्या हांगझोउ या शहरात आहे. जुलै २०२३ मध्ये या कंपनीची स्थापना झाली. लियांग वेनफेंग नावाच्या व्यक्तीचा हा स्टार्ट अप आहे. ओपन एआय सारखंच मानुष्याप्रमाणे कामं करू शकणारं एआयवर आधारित एक टूल बनवनं हा या लियांग वेनफेंगचं ध्येय आहे.
या DeepSeek नावाच्या कंपनीने DeepSeek R1 नावाचं एक एआय टूल विकसित केलं आहे. हे टूल Large Scale Reinforcement Learning and Chain of Thoughts Reasonging वर आधारित आहे. त्यामुळे हे टूल इतरांपेक्षा अधिक अचूक असल्याचे सांगितले जाते. DeepSeek R1 हा Large Language Models (LLM) वर आधारित नसून, reasoning आणि cognitive thinking वर फोकस करणारा AI आहे.
या टूलचे दोन व्हर्जन्स आहे. DeepSeek R1 आणि DeepSeek R1 झीरो. इतर एआय टूल्सपेक्षा DeepSeek चांगली कामगिरी करत असल्याचे सांगितले जाते. हे दोन्ही ओपन-सोर्स तत्त्वावर आधारित आहेत. या मॉडेल्सचा वापर विनामूल्य करता येतो, त्यामुळे OpenAI, Google आणि Meta सारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, अजून तरी हे टूल Open Weight आहे. यामध्ये सुधारणा होत आहे.
DeepSeek लोकप्रिय होण्याची कारणं काय आहे?
DeepSeek हे तंत्रज्ञान चीनी असलं तरी अमेरिकेत ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. याची काही कारणं आहेत.
१)स्वस्त आणि प्रभावी: DeepSeek हे तंत्रज्ञान चॅटजीपीटी पेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे अमेरिकेसारख्या देशात त्याची लोकप्रियता वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ओपन एआयसाठी एक मिलियन इनपुट टोकनसाठी १५ डॉलर्स तर एक मिलियन आउटपुट टोकनसाठी ६० डॉलर्स खर्च करावे लागतात.
त्या तुलनेत DeepSeek साठी एक मिलियन इनपुट टोकनसाठी ०.५५ डॉलर्स तर एक मिलियन आउटपुट टोकनसाठी २.१९ डॉलर्स खर्च करावे लागतात.
२) DeepSeek ची कामगिरी ही चॅट जीपीटी इतकीच चांगली आहे.
३) DeepSeek चे वेगवेगळे व्हर्जन्स तयार केले आहे. त्यामुळे मोबाइल, लॅपटॉप, कम्प्युटरवर आपण ते सहज वापरू शकतो.
४) केवळ २ महिन्यांच्या आत हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे.
५) हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी केवळ ६ मिलियन डॉलर्स खर्च झाला आहे.
६) ओपन एआय, मेटा, जेमीनी सारखाच DeepSeek ची कामगिरी देखील उच्च प्रतीची आहे.
DeepSeek मुळे अमेरिकन शेअर मार्केटमध्ये खळबळ
भारतीय शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने दिसणाऱ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. पण आता अमेरिकन शेअर बाजारात एका चिनी उत्पादनामुळे मोठा गहजब उडाला आहे. चीनच्या डीपसीक या तंत्रज्ञानामुळे अमेरिकेचा शेअर बाजार तब्बल ३ टक्क्यांनी कोसळला आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डीपसीक हा अमेरिकेतील कंपन्यांसाठी इशारा असल्याची भूमिका मांडली आहे. सोमवारी डीपसीक लाँच झाल्यानंतर एव्हीडीया चे शेअर्स चार महिन्यातील नीचांकी स्तरावर पोहोचले आहेत.
कसा आणि कुठे करावा वापर?
chat.deepseek.com इथे जावून साईन इन करा. इथे DeepSeek R1 वर क्लिक करून तुम्ही हे तंत्रज्ञान वापरू शकता.