प्रातिनिधिक छायाचित्र....
Health Tips : आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो. काही पदार्थ असे असतात जे आपल्या शरीराला थेट नुकसान पोहोचवतात, तर काही पदार्थ हळूहळू आपले शरीर कमकुवत करतात आणि आपल्याला ते कळतही नाही. बऱ्याचदा, चुकीचा आहार घेतल्यानेही दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो. यासोबतच ते तुमचे वजन देखील कमी करतात. म्हणून, तुम्ही याऐवजी तुमच्या आहारात निरोगी अन्नाचा समावेश करावा. तर जाणून घेऊया, कोणते पदार्थ (Do not eat this food by mistake) आहारातून टाळावेत...
1. प्रक्रिया केलेले मांस (Process meat) : फ्रोझन चिकन किंवा सॉसेजसारखे प्रक्रिया केलेले मांस सोयीस्कर आणि चविष्ट मानले जाते, परंतु ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. हे मांस नायट्रेट्स आणि नायट्रेट्स सोबत स्टोर केले जातात ज्यामुळे कर्करोगाचा, विशेषतः कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढू शकतो, 2010 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात स्पष्टपणे म्हटले आहे की लाल आणि प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने मृत्युदर आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो. या मांसामध्ये चरबी आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदयरोग आणि रक्तदाबाचा धोका देखील वाढू शकतो.
2. कोल्ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स (Cold Drinks or energy drinks)- कोल्ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्समध्ये अतिरिक्त साखर असते, ज्यामुळे आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त साखरेचे सेवन केल्याने वजन वाढते, इन्सुलिन प्रतिरोधकता येते आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या पेयांमुळे हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणाशी संबंधित आजार होतात. यामुळे दरवर्षी जगभरात 1 लाख 84 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू होतो. म्हणून, ते पिण्याऐवजी, तुमचे शरीर हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यासाठी पाणी, हर्बल टी किंवा साखरमुक्त पेये प्यावीत.
Health Tips For Diabetics | निरोगी-तंदुरूस्त राहण्यासाठी आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही फळे अशी आहेत जी मधुमेहाने त्रस्त लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात. #Diabetics #HealthTips
— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) January 21, 2025
सविस्तर बातमी येथे 👇 वाचाhttps://t.co/KsnUIDNIUv pic.twitter.com/Huk9OsChk8
3. पॅकबंद स्नॅक्स (Packaged snacks) - चिप्स, क्रॅकर्स आणि इतर पॅकबंद केलेले स्नॅक्स दिर्घकाळ टिकवण्यासाठी जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले असतात आणि त्यात अनहेल्दी एडिटिव्स, प्रिजर्वेटिव आणि मीठ भरलेले असते. पदार्थ तयार करताना किंवा चवीनुसार वापरल्या जाणाऱ्या मीठामध्ये सहसा सोडियम असते आणि जास्त सोडियम सेवन केल्याने उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या समस्या आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे, त्याऐवजी तुम्ही आहारात नट्स (किशमिश,काजू, बादाम,खजूर,पिस्ता) किंवा ताजी फळे यासारखे निरोगी पदार्थ समाविष्ट करू शकता.