Guillain Barre Syndrome: घाबरु नका, वेळीच उपचार झाल्यास 100 टक्के बरा होतो गुलियन बॅरी सिंड्रोम, कशी घ्यावी काळजी?

पुण्यातील एकूण जीबीएस रुग्णांची संख्या रविवारी 111 वर पोहोचली असून त्यात 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. तर यापैकी 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Desk User
  • Tue, 28 Jan 2025
  • 01:06 pm
Guillain Barre Syndrome,Guillain Barre Syndrome Update,HEALTH,Pune News,Pune Municipal Corporation,Kamla Nehru Hospital,Guillain Barre Syndrome,Guillain Barre Syndrome Update,HEALTH,Pune

संग्रहित

पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोम आजराच्या रुग्णांमध्ये वाढतं प्रमाण पाहता शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.  पुण्यातील एकूण जीबीएस रुग्णांची संख्या रविवारी 111 वर पोहोचली असून त्यात 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. तर यापैकी 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या पार्श्वभूमिवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर असून सात जणांच्या तज्ज्ञांचे पथक राज्यात तैनात केले आहे. 

 

दरम्यान, लक्षणांवर तातडीने उपचार केल्यास अनेक रुग्ण पूर्णत: बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी व्हायरल इन्फेक्शननंतर येणाऱ्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास, जीबीएसवर सहज मात करता येते असं उपचारांमधून स्पष्ट झाले आहे. 

 

 

गुलियन बॅरी सिंड्रोम आजाराची लागण कशी होते

 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.

 

संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.

 

प्रतिकारशक्ती कमी झाल्यास मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.

 

यासोबतच, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळेही या आजाराची लागण होण्याची शक्यता

 

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

अतिसार

पोटदुखी

ताप

मळमळ किंवा उलट्या

 

कशी काळजी घ्यावी

 

पाणी उकळून व गाळून प्यावे.

उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.

अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

Share this story

Latest