Tulshi Bagh Ganapati : मोरया रे बाप्पा... मोरया रे...! गुरुजी तालीम आणि तुळशीबाग गणपतीच्या मिरवणूकीने परिसर दुमदुमला

पुण्यातील लक्ष्मी रोड येथील मानाच्या गुरुजी तालीम आणि तुळशीबाग गणेश मंडळाची जोरदार मिरवणूक काढण्यात आली आहे.

गुरुजी तालीम आणि तुळशीबाग गणपतीच्या मिरवणूकीने परिसर दुमदुमला

गणेशोत्सवाला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे. या गणेशोत्सवासाठी पुणे सज्ज झाले आहे. संपूर्ण पुण्यात मंगलमय वातावरण झाले आहे. पुण्यातील लक्ष्मी रोड येथील मानाच्या गुरुजी तालीम आणि तुळशीबाग गणेश मंडळाची जोरदार मिरवणूक काढण्यात आली आहे. यातच पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मिरवणुकी पाहण्यासाठी अनेक पुणेकर लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर एकत्र आले आहेत.

पुणेकरांची गर्दी आणि ढोल-ताशाचा गजर यामुळे अवघा परिसर दुमदुमून गेला आहे. दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून ढोल ताशा पथकांचा सराव सुरु होता. या हजारो वादक आजच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. त्यामुळे हजारो वादक पुण्याच्या मध्यवर्ती भागात वादनासाठी एकत्र जमले आहेत. अनेकांना गणरायाच्या आगमनाची आता ओढ लागली आहे. बेलबाग चौकात, लक्ष्मी रस्त्यावर आणि प्रत्येक मानाच्या आणि महत्वाच्या गणपतीसमोर ढोल ताशा पथके वादन करताना दिसून येत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest