बाप्पाच्या स्वागतासाठी मराठी सिने कलाकारांकडून ढोल-ताशाचे जोरदार सादरीकरण
गणेशोत्सवाला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे. मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे पुणेकरांकडून स्वागत करण्यात आले आहे. यावेळी गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला आहे. पुण्यात गणोशात्वाचा वेगळाच थाट अनुभवायला मिळतो. विशेषतः पुण्यात मराठी कलाकारांनी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे स्वागत केले आहे. कलावंत ढोलताशा पथकाने त्यांची कला सादर केली आहे.
पुण्यातील मानाच्या गणपतीसह सार्वजनिक आणि घरगुती गणपतीच्या आगमनाची लगबघ सध्या शहरात सुरू आहे. अशातच मराठी अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री अनुजा साठे यांनी गणपतीच्या आगमण मिरवणूकीला हजेरी लावली. यावेळी त्यांच्या ढोल-ताशा पथकात सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केले आहे.
अनेक दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाढ पाहत होतो. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ढोल पथकांचा सराव सुरू होता. उत्कृष्ठ सादरीकरण कसे करता येईल, याकडे सर्वांचे लक्ष होते. पुण्यात आलं की सर्व बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. लहाणपणापासून पुण्यातील गणेशोत्सव अनुभवत आलो आहे, त्यामुळे आजही तेवढाच उत्साह आहे, अशा भावना यावेळी सौरभ गोखले आणि अनुजा साठेने सीविक मिररशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.