Advertisement

Kashmira Pardeshi : पंजाब किंग्सला चियर करणारी परदेशी कोण?

Kashmira Pardeshi Kashmira Pardeshi

इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये Kashmira Pardeshi शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात एका तरुणीने लक्ष वेधून घेतले. ही ‘मिस्ट्री गर्ल’ दुसरी कोणी नसून अभिनेत्री काश्मीरा परदेशी असल्याचे समोर आले असून, पंजाब किंग्सचा फलंदाज निहाल वढेरा आणि ती डेट करत असल्याची चर्चा मीडियावर रंगली.

चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात काश्मीरा पंजाब किंग्सला चियर करताना कॅमेऱ्यात कैद झाली. विशेष म्हणजे, प्रीती झिंटा हिच्यासोबत बसलेली दिसली. संघाने परिधान केलेली जर्सी आणि तिचा उत्साह पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल केले. निहाल वढेरा आणि तिच्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.

अभिनेत्री काश्मीराने दाक्षिणात्य आणि हिंदीत स्वतःची ओळख निर्माण केली. तिने २०१८ मध्ये ‘नर्तनाशाला’ या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २०१९ मध्ये तिने ‘सिवप्पू मंजल पचाई’ या चित्रपटाद्वारे तमिळ सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्याच वर्षी अक्षयच्या बहुचर्चित ‘मिशन मंगल’ या हिंदी चित्रपटातही ती झळकली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द फ्रीलान्सर’ या हिंदी वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

सामन्यादरम्यानच्या तिच्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. काहींनी निहाल वढेरासोबतच्या तिच्या मैत्रीबद्दल कुतूहल व्यक्त केले आहे. मात्र, या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल अद्याप मौन बाळगले आहे. सोशल मीडियावरील ही केवळ अफवा आहे की वास्तव, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post
Raghav Chaddha

Raghav Chaddha : राघवला प्रियंकाची साथ

Next Post
Health News

Health News : सावधान! 'मसल्स'च्या नादात किडनी निकामी नको