आपच्या राज्यसभेतील उपनेते पदावरून खा. राघव चढ्ढा Raghav Chaddha यांना हटवण्यात आले आहे. त्यानंतर ते सतत चर्चेत आहेत. आता या प्रकरणावर प्रियंका चोप्राचीही प्रतिक्रिया आली आहे. आपने सचिवालयाला कळवले आहे की राघव यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ देऊ नये. राघव यांनी यावर प्रतिक्रिया देत त्यांच्या इन्स्टावर व्हिडीओ शेअर केला. त्यात लिहिले, की मला शांत करण्यात आले आहे, मी हरलो नाही. सामान्य माणसासाठी माझा संदेश. अनेकांनी आपच्या या निर्णयानंतर राघव चड्ढा यांच्या समर्थनात आवाज उठवला, कारण ते सदनात मध्यमवर्गीयांच्या हक्कांसाठी बोलत आले आहेत.
या प्रकरणावर प्रियंका चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण चित्रपट नसून तिच्या जीजू राघव यांना दिलेला पाठिंबा आहे. राघव यांच्या या व्हिडिओवर प्रियंकाने टाळ्या आणि हृदयाच्या इमोजीद्वारे आपला पाठिंबा व्यक्त केला. तिची ही छोटीशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि लोकांचे लक्ष वेधून घेतले. माहितीसाठी, राघव यांचा विवाह अभिनेत्री परिणीतीशी झाला आहे, ज्या प्रियंका हिची चुलत बहीण आहे. त्यामुळे प्रियंकाचा हा पाठिंबा केवळ सार्वजनिक नसून कौटुंबिक नात्याचेही प्रतीक आहे. आता हे प्रकरण केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता बॉलिवूड आणि सोशल मीडियातही चर्चेचा मोठा विषय ठरले आहे.


