Advertisement

जान्हवी कपूर ‘धडक’नंतर नैराश्यात…

बॉलीवूडच्या जान्हवी कपूरने कठीण परिस्थितीत सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. तिच्या पहिल्या चित्रपटाआधीच तिची आई श्रीदेवी यांचे निधन झाले होते. जान्हवीने आता एका मुलाखतीत खुलासा केला की, पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ती नैराश्यात (डिप्रेशनमध्ये) गेली होती, कारण- तिला असे वाटायचे की, लोक तिचा तिरस्कार करतात.

तिने दिलेल्या माध्यमाच्या मुलाखतीतीत सांगितले की, “माझ्या पहिल्या चित्रपटाबद्दल लोक सांगतात की, तू त्यात खूप छान काम केलं होतंस किंवा आम्हाला ‘धडक’ आवडला. माझ्यासाठी त्या चित्रपटाच्या आठवणी खूप वेगळ्या आहेत. ‘धडक’नंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मला वाटलं होतं की, आता सगळं संपलंय, लोक माझा तिरस्कार करतात. मला नेहमी माझ्या आईकडूनच प्रोत्साहन मिळायचं. ती गेल्यानंतर मी विचार केला की, आता प्रेक्षकच मला ते प्रोत्साहन देतील. पण मला हे माहीत नव्हतं की, असं कधीच घडत नाही. मी फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष देत होते. हा चित्रपट ‘सैराट’नंतर यशस्वी चित्रपट ठरला होता; पण तो हिट झालाय हे माझ्या लक्षातच आलं नाही. ”

‘धडक’आणि गुंजन सक्सेनाच्या वेळी मला असे भासवले की, मला सगळे सहज मिळाले आहे, ज्यासाठी मी पात्र नाही. याचा अर्थ असा होतो की, मला माझ्या पालकांच्या कामामुळे मला संधी मिळत आहे. त्यावेळी मला माझ्या पालकांबद्दल खूप आदर आणि प्रेमही वाटत. कारण त्यांच्यामुळेच मला काम मिळत होते.” शशांक खेतान दिग्दर्शित आणि करण जोहरची निर्मिती असलेला ‘धडक’ हा चित्रपट २०१६ च्या गाजलेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. त्यानंतर जान्हवीने ‘गुंजन सक्सेना’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘रुही’ व ‘गुड लक जेरी’ यांसारख्या सिनेमात काम केले.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

US-israel-iran war | अमेरिकेची अवस्था नरकापेक्षाही वाईट करू; ट्रम्प यांच्या धमकीला इराणने दिले आक्रमक प्रत्युत्तर...

Next Post

Pune Tanker Accident| रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...! भरधाव टँकरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू...