Advertisement

Bigg Boss Marathi 6 : ‘हा’ तगडा स्पर्धक घराबाहेर; प्रेक्षकही झाले भावूक…

‘बिग बॉस मराठी ६’च्या सहाव्या पर्वात १२ व्या आठवड्यात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले. फिनालेच्या शर्यतीत असलेला आणि प्रेक्षकांचा लाडका स्पर्धक सागर कारंडे याला घराबाहेर पडावे लागले. या निर्णयामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी आणि दुःख व्यक्त केले.

‘भाऊच्या धक्क्यावर’ झालेल्या एलिमिनेशनमध्ये सागर कारंडेचे नाव जाहीर होताच घरातील वातावरण भावूक झाले. सागर नेहमी शांत, समजूतदार आणि सर्वांसोबत जुळवून घेणारा स्पर्धक म्हणून ओळखला जात होता. अनेक टास्कमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. मात्र कमी मतदान मिळाल्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

सागर घराबाहेर जाताना विशाल निकम आणि अनुश्री माने यांसारखे सदस्यही भावूक झाले. सर्वांना प्रेमाने निरोप देत सागरने आपला प्रवास संपवला. दरम्यान, सागरच्या एलिमिनेशननंतर सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अनेकांच्या मते सागर हा टॉप ५ मध्ये असण्यास पात्र स्पर्धक होता. आता सागर बाहेर गेल्यानंतर घरात मोजकेच स्पर्धक उरले असून ग्रँड फिनालेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उर्वरित स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Pune Tanker Accident| रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...! भरधाव टँकरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू...

Next Post

संपादकीय : राजकीय संस्कृतीची कसोटी