संग्रहीत छायाचित्र
पुणे- गुरुवारी रात्री चंदनगर परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला असून प्रदीप अडागळे असे मृत तरुणाचे नाव आहे.या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे या दोघांनी मिळून त्याचे डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार केले. अडागळे गंभीर अवस्थेत असताना त्याला ससून येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघाही आरोपींना चंदन नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अडागळे हा सतत ऋषी आणि त्याच्या आईला शिवीगाळ करत असल्यामुळे दोघांनी त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.