थेरगावात टोळक्याचा राडा; पिस्तूल, कोयते हवेत फिरवून वाहनांची तोडफोड

पिंपरी चिंचवड: टोळक्याने पिस्तूल, कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी १२ जणांना पोलिसांनी अटक केली.

संग्रहित छायाचित्र

वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

पिंपरी चिंचवड: टोळक्याने पिस्तूल, कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी १२ जणांना पोलिसांनी अटक केली. (Pimpri Chinchwad News)

स्वराज काॅलनीतील पवारनगर येथे शनिवारी (दि. २०) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या टोळक्याने बिअरच्या बाटल्या रस्त्यावर फोडून वाहनांची तोडफोड केली. तसेच तिघांकडील रोकड हिसकावली. (Pimpri Chinchwad Crime)

अक्षय विलास केदारी (वय २८, रा. पवारनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कैवल्य दिनेश जाधवर (वय १९, रा. उंद्री, हडपसर), शिवशंकर शामराव जिरगे (वय २२, रा. दत्तानगर, थेरगाव), सुमित सिद्राम माने (वय २३, रा. शिवराजनगर, रहाटणी), विराज विजय शिंदे (वय २०, रा. जनता वसाहत, पर्वती), गणेश बबन खारे (वय २६, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव), अजय भीम दुधभाते (वय २२, रा. पडवळनगर, थेरगाव), शुभम चंद्रकांत पांचाळ (वय २३, रा. काळेवाडी), ऋषिकेश हरी आटोळे (वय २१, रा. बेलठीकानगर, शिवदर्शन काॅलनी, थेरगाव), रोहित मोहन खताळ (वय २१, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव), मुन्ना एकनाथ वैरागर (वय २१, रा. पवारनगर, थेरगाव), अनिकेत अनिल पवार (वय २७, रा. पवारनगर, थेरगाव), प्रीतम सुनील भोसले (वय २०, रा. आदर्शनगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हे वाहनांवरून आले. हातामध्ये पिस्तूलसारखे हत्यार, कोयते, लाकडी दांडकी, बियरच्या बाटल्या, घेऊन बेकायदेशीर एकत्र येऊन ते हवेत फिरवून परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण केली. बियरच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्या. रस्त्याच्या कडेला असलेली रिक्षा व दुचाकी कोयत्याने फोडून नुकसान केले. फिर्यादी अक्षय केदारी यांच्या खिशातील एक हजार ६०० रुपये मित्र यश सपकाळ याच्या खिशातील एक हजार २०० रुपये व मित्र अजय नवले याच्या खिशातील ७०० रुपये, असे एकूण तीन हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन धमकी दिली. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Share this story

Latest