तडीपार केलेल्या गुन्हेगाराला बंडगार्डन पोलीसांनी ठोकल्या बेड्या

पुणे: दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगाराला बंडगार्डन पोलीसांनी बेड्या ठोकल्या. श्याम किशोर काळे (रा. ताडीवाला रोड) असे घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 1 Oct 2024
  • 02:08 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे: दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगाराला बंडगार्डन पोलीसांनी बेड्या ठोकल्या. श्याम किशोर काळे (रा. ताडीवाला रोड) असे घेण्यात आलेल्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन पोलीस स्टेशनकडून मार्च २०२४ मध्ये श्याम किशोर काळे याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र श्याम काळे हा गुन्हेगार रेल्वे गारोऊंड ग्राऊंड जवळ, प्रायव्हेट रोड परिसरात आल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत युनिट २ चे  पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, संजय जाधव,  निखिल जाधव यांना कळले. त्यानुसार त्यांनी तात्काळ कारवाई करून  काळे यास तेथून ताब्यात घेतले. यावेळी काळे याच्याकडे  धारदार शस्र मिळून आले. काळे याच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट कलम ४/२५ सह म.पो.का. कलम १४२ नुसार कार्यवाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (युनिट 2) प्रताप मानकर  व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी केली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest