Crime News : वैमनस्यातून भावंडांवर धारदार हत्याराने वार, धानोरीतील मुंजाबा वस्तीतील घटना; विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वैमनस्यातून दोघा भावंडांवर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याची घटना धानोरी येथील मुंजाबा वस्तीत घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Sun, 27 Apr 2025
  • 06:30 pm
pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

पुणे: वैमनस्यातून दोघा भावंडांवर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याची घटना धानोरी येथील मुंजाबा वस्तीत घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे. 

पंकज कुमार आणि साहू कुमार (दोघेही रा. मुंजाबावस्ती, धानोरी) असे जखमी झालेल्या भावंडांची नावे आहेत. याप्रकरणी राजेश राधेश्याम गुप्ता (वय ४०, रा. धानोरी) याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचे साथीदार नितीन गुप्ता (वय २५), आकाश गुप्ता (वय १९) याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल कुमार गौतम (वय २३, रा. मुंजाबावस्ती) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजकुमार आणि गुप्ता यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडणे झाले होती. त्याचा गुप्ता कुटुंबियांमध्ये राग होता. या वादातून शुक्रवारी (२५ एप्रिल) रात्री आरोपी गुप्ता याने पंकजकुमारवर धारदार हत्याराने वार केले. भांडणे सुरू असताना पंकजचा भाऊ साहू हा मध्यस्थी करण्यासाठी गेला. त्यावेळी टोळक्याने त्याच्यावरही धारदार हत्याराने वार केले. 

या हल्ल्यात पंकज आणि साहू दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. दोघा भावंडांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे तपास करीत आहेत.

Share this story

Latest