Pune | ‘पॉपीस्ट्रॉ’ अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगल्याने एकास अटक, आरोपीकडून एक लाख ४७ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त...

अफीमच्या बोंडांचा चुरा म्हणजेच पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ बेकीयदेशीररित्या विक्रीसाठी बाळगल्याने पोलिसांनी एकास अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

प्रातिनिधिक छायाचित्र...

वानवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

पुणे : अफीमच्या बोंडांचा चुरा म्हणजेच पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ बेकीयदेशीररित्या विक्रीसाठी बाळगल्याने पोलिसांनी एकास अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार उमेश बबन रजपुत यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रेमाराम गंगाराम चौधरी (वय २८, रा. जोधपुर) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील भैरोबानाला जंक्शन येथील रस्त्यावरून शनिवारी (२६ एप्रिल) वानवडी पोलिसांनी आरोपी चौधरी याला ताब्यात घेतले. चौधरी याच्याकडे पॉपीस्ट्रॉ अथवा दोडाचुरा (अफीमच्या बोंडांचा चुरा) हा अंमली पदार्थ सापडला. चौधरी याने बेकायदेशीररित्या पॉपीस्ट्रॉची विक्री करण्यासाठी जवळ बाळगला होता.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून एक लाख ४२ हजार ४९० रुपये किंमतीचा १४ किलो २४९ ग्रॅम पॉपीस्ट्रॉ, दोन हजार रुपयांच्या दोन बॅगा, दोन हजारांचा एक साधा मोबाईल फोन, आधारकार्ड, ५२० रुपये रोख रक्कम असा एक लाख ४७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलिसांनी आरोपी चौधरी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Share this story

Latest