Pune Crime | ‘एपीके फाईल’च्या सहाय्याने ऑनलाईन चोरी

आरटीओच्या नावाने वाहतूक नियमभंगाचे बनावट डिजिटल चलन सायबर चोरट्यांनी महिलेला पाठविले. हे बनावट चलन 'एपीके फाईल'मध्ये मध्ये होते. महिलेने ही फाईल उघडताच तिचा मोबाईल हॅक झाला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून सात लाख रुपयांची रक्कम चोरून आर्थिक फसवणूक केली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune Newsz

संग्रहित छायाचित्र

सायबर चोरट्यांकडून महिलेची सात लाख रुपयांची फसवणूक, आंबेगाव पोलिसांत अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

आरटीओच्या नावाने वाहतूक नियमभंगाचे बनावट डिजिटल चलन सायबर चोरट्यांनी महिलेला पाठविले. हे बनावट चलन 'एपीके फाईल'मध्ये मध्ये होते. महिलेने ही फाईल उघडताच तिचा मोबाईल हॅक झाला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून सात लाख रुपयांची रक्कम चोरून आर्थिक फसवणूक केली.

याबाबत अमृता रोहण गुरव (वय ३३, रा. जांभुळवाडी, आंबेगाव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमृता गुरव या जांभुळवाडी रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीत राहायला आहे. सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात २१ मे रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ‘एपीके फाईल’ पाठविली होती. या फाईलवर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) ट्रॅफिक चलन असा उल्लेख होता. गुरव यांनी वाहतूक नियमभंगाचे चलनाची फाईल आल्याने ही फाईल त्वरित उघडली. ही फाईल उघडताच त्यांचा मोबाइल हॅक झाला आणि सायबर चोरट्यांनी मोबाइलचा ताबा घेतला. त्यानंतर गुरव यांचे सोशल मीडियावरील अकाउंट निष्क्रिय झाले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरली.

बँक खात्यास मोबाइल क्रमांक जोडला असल्याने चोरट्यांकडे सर्व माहिती पोहोचली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून सात लाख रुपयांची रक्कम स्वत:च्या खात्यात वळविली, अशी माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले यांनी दिली. बँकेच्या खात्यातून पैसे लंपास झाल्यानंतर महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक चोरमोले तपास करत आहेत.

दरम्यान, सायबर चोरट्यांकडून 'एपीके फाईल' पाठवून फसवणूक करण्यात येत आहे. यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे घडले आहेत. अशा प्रकारच्या फाईल्सच्या माध्यमातून फसवणूक करण्यात येते.  नागरिकांनी अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या एपीके फाईल उघडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने १९ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १९ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत अभिजित विष्णुकांत गावडे (वय ४५, रा. सोमवार पेठ) यांनी  समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार  गावडे सोमवार पेठेत राहायला आहेत. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे प्रलोभन चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. सायबर चोरट्यांनी सांगितल्यानुसार गावडे यांनी खात्यात रकम जमा केली. सुरुवातीला चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. त्यानंतर गेल्या महिनाभरात गावडे यांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १९ लाख रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा देणे बंद केले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गावडे यांनी  पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.

Share this story

Latest