Pune Crime: घरफोडी करणाऱ्या तिघांस अटक

पुणे: घरफोडी तसेच दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांस अटक केली आहे. अधिक तपास केला असता त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकलीही जप्त करण्यात आल्या आहे. सदर कारवाई हडपसर पोलिसांनी केली.

घरफोडी करणाऱ्या तिघांस अटक

तीन गुन्हे उघडकीस आणत एकूण ५,४०,७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

पुणे: घरफोडी तसेच दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांस अटक केली आहे. अधिक तपास केला असता त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकलीही जप्त करण्यात आल्या आहे. सदर कारवाई हडपसर पोलिसांनी केली.  (Pune Crime News)

ऋषिकेश संतोष मोटे (वय २० वर्ष, रा.खुटवड चौक, फुरसुंगी,) प्रदीप भागवत पोळ (वय २० वर्ष, रा.चंदवडी कॅनॉल जवळ फुरसुंगी) आणि कृष्णा भिमा पवळ (वय १९ वर्ष, कामठे आळी, रा. फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. 

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी ओंकार विलास जगताप यांचे  फुरसुंगी येथील खुटवड चौकातील एका सोसायटीत घर आहे. दि. २३ जानेवारी २०२४ रोजी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने, डायमंड रिंग, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण ३,४०,७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. त्याविरोधात फिर्यादी यांनी हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे घरफोडी आणि चोरीच्या गुन्हाची नोंद करून घेतली होती. 

दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीकक्ष अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार अनिरूध्द सोनवणे, प्रशांत दुधाळ व निखील पवार यांच्या तपास पथकाने कारवाई सुरू केली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ऋषिकेश संतोष मोटे, प्रदीप भागवत पोळ आणि कृष्णा भिमा पवळ या तिघा आरोपींना ताब्यात घेतले. तपासादरम्यान पोलिसांना या तिघांचाही सदर गुन्ह्यात समावेश असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. हडपसर पोलिसांनी सदर गुन्ह्यात चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला आहे. अधिक तपासात पोलिसांनी आरोपींकडून ५० हजार किमतीची पॅशन प्रो मोटारसायकल आणि १.५० लाख किमतीची बुलेट अशा दोन मोटरसायकलीही जप्त केल्या आहे. या कारवाई दरम्यान हडपसर पोलिसांनी तीन गुन्हे उघडकीस आणत एकूण ५,४०,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अनिरूध्द सोनवणे, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांच्या पथकाने केली. 

Share this story

Latest