Pune | अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणातील आरोपी उज्जैनमधून जेरबंद, सहकारनगर पोलिसांच्या तपास पथकाची कारवाई

पहाटे घरी जाणाऱ्या पीडितेला पिस्तुलाचा धाक दाखवून विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 17 Apr 2025
  • 07:29 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

सहकारनगर पोलिसाचे तपास पथक....

पुणे : पहाटे घरी जाणाऱ्या पीडितेला पिस्तुलाचा धाक दाखवून विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आरोपी पसार झालेल्या आरोपीला सहकारनगर पोलिसांच्या तपास पथकाने मध्यप्रदेशातील उज्जैन येथून जेरबंद केले. 

दिपक शिवाजी ठाकर (वय ४५ , रा. चव्हाणनगर, धनकवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम  तसेच शस्त्र कायद्याअन्वये गुन्हा दाखल आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मार्चला पहाटे सव्वा चारच्या सुमारास पीडिता घरी जात होती. आरोपी ठाकर याने पीडितेला पिस्तुलाचा धाक दाखवून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पसार झाला होता. भारतभरात तो विविध ठिकाणी आपली ओळख लपवून राहत होता. १४ एप्रिलला पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी ठाकर याच्याबद्दल माहिती मिळाली. तो मध्यप्रदेशातील उज्जैन येथे असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पोलिसांचे  एक तपास पथक उज्जैनला रवाना करण्यात आले. या तपास पथकाने आरोपी आरोपी राहत असलेल्या लॉजची माहिती मिळवून वेषांतर करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने संबंधित गुन्हा केला केल्याचे कबूल केले.

दरम्यान, उज्जैनमधील खाराकुंवा पोलीस ठाण्यात आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर उज्जैन येथील न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. त्यानंतर ट्रांझिट रिमांड घेऊन आरोपीला पुण्यात आणले. त्यानंतर विशेष सत्र न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त  राहुल आवारे करीत आहेत. 

अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ निरीक्षक राहुल गौड, निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली  तपास पथकाचे सहायक निरीक्षक सागर पाटील, सहायक उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, चंद्रकांत जाधव, प्रदिप रेणुसे, सागर सुतकर, बजरंग पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे, योगेश ढोले, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे यांनी ही कारवाई केली.

Share this story

Latest