संग्रहित छायाचित्र
पुणे: लष्कर परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी एका महाविद्यालयीन तरुणाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण लष्कर परिसरात एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी पावणेसहाच्या सुमारास पूना कॉलेज परिसरातून दुचाकीवरुन जात होता. पूना कॉलेज परिसरातील रस्त्यावर दोन चोरट्यांनी त्याला अडवले. त्याला चाकूचा धाक दाखवला आणि जिवे मारण्याची धमकी दिली. युवकाला मारहाण करुन खिशातील १२०० रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले.
पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे तपास करत आहेत.