संग्रहित छायाचित्र
वाघोली - खराडी - मुंढवा रोडवर मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. त्यावर खराडी पोलिसांनी कारवाई करून चालवणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल केले. तर सहा महिलांची सुटका केली.
खराडीतील थिटेनगर येथील गोल्ड प्लाझा इमारतीत सिल्व्हर सोल स्पा ब्यूटी ॲन्ड वेलनेस नावाने मसाज सेंटर सुरू होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर त्या सेंटर वर छापा टाकण्यात आला.
उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस कर्मचारी नवनाथ वाळके, सुरेद्र साबळे, अर्जुन बुधवंत, अमोल भिसे, सचिन पाटील, अक्षय गार्डे, सूरज जाधव, जयवंत श्रीरामे, महिला पोलीस अंमलदार ज्योती मेमाणे, पूजा डाहाळे, अर्चना गोफणे या पथकाने ही कामगिरी केली.
महिलांना ठेवण्यात आले सुधारगृहात
ते सेंटर चालविणारे लेनखोकै किपगेन ( रा. मणिपूर ) व विकास किशोर ढाले ( रा. अमरावती ) यांच्यावर गुन्हा दाखल केला. तेथे असणाऱ्या सहा महिलांची सुटका केली. त्यामध्ये तीन महिला थायलंड, एक मणिपूर, एक नागालँड व एक पुण्याची असल्याचे समोर आले. तेथील व्यवस्थापक लेनखोकै याला अटक करण्यात आली. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. ढाले याचा पोलीस शोध घेत आहे. महिलांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार पूजा डहाळे यांनी फिर्याद दिली.