सग्रहीत छायाचित्र
शहरातील हायप्रोफाईल 'पोर्शे' कार अपघात प्रकरणामुळे मोठी खळभळ उडाली होती आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटक केली होती. आता या अपघातप्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी 'पोलीस महासंचालक' कार्यालयाकडे पाठविला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे तसेच सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी असे प्रस्ताव पाठविलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत.
दरम्यान, कर्तव्यास कसूर केल्याप्रकरणी त्यांना २४ मे रोजी निलंबित करण्यात आले होते. शहरातील कल्याणीनगर भागामध्ये १९ में रोजी मध्यरात्री पबमधून पार्टीकरून घरी जाणाऱया एका बड्या बापाच्या अल्पवयीन सुपुत्राने भरधाव 'पोर्शे' कारने दुचाकीवरील तरुण-तरुणींना जदोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर यातून त्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी पैशांच्या जोरावर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यातूनच ३०० शब्दांचा निबंध लिहण्यास सांगितल्यामुळे हे प्रकरण संपुर्ण देशामध्ये गाजले होते. पैशांच्या वापर करून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत त्या अल्पवयीन मुलाला वाचविण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता. त्या नंतर या प्रकरणात अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन येरवडा पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक राहुल जगदाळे तसेच रात्रपाळीवर असलेले सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तडकाफडकी निलंबित केले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती.
आता विभागीय चौकशी पुर्ण झाली असून त्यात हे दोन्ही अधिकारी दोषी आढळले आहेत. त्यानूसार त्यांना आता पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.