Maharashtra Control of Organized Crime Act
पुणे: बिबवेवाडीतील गुंड सनी जाधवसह साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) करवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. गुंड सनी जाधव याची बिबवेवाडी भागात दहशत आहे.
सनी शंकर जाधव (वय २६, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी) याच्यासह त्याचे साथीदार सलमान हमीद शेख (वय २५, रा. दिलासा अपार्टमेंट, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता), हर्षल संतोष चव्हाण (वय १९, रा. पवळे चौक, कसबा पेठ), शक्ती गुरव (रा. लातूर) अशी ‘मोक्का’ कारवाई करण्यात आलेल्या सराइतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी जाधव आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे, लूट, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.