पिंपरी-चिंचवड : औषधाच्या नावाखाली होतोय जिवाशी खेळ

औषधे ही रुग्णांसाठी संजीवनी असतात. मात्र, गेल्या १५ दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात औषधांबाबत तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून यामुळे औषधांच्या नावाखाली रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Pimpri Chinchwad Crime

पिंपरी-चिंचवड : औषधाच्या नावाखाली होतोय जिवाशी खेळ

पंधरा दिवसांत पिंपरी-चिंचवड परिसरात तीन गुन्हे दाखल

औषधे ही रुग्णांसाठी संजीवनी असतात. मात्र, गेल्या १५ दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात औषधांबाबत तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून यामुळे औषधांच्या नावाखाली रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत बेकायदा औषध विक्री, इंजेक्शनची विक्री झाल्याचे दिसून आले असून ती शरीरास प्राणघातक ठरू शकतात.  

सध्या बदलत्या हवामानामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि व्हायरल तापाची साथ जोरदार आहे. याबाबत कोणत्या तापावर कोणते औषध घ्यावे हे डॉक्टरांना माहिती असते. मात्र,  काहीजण ताप आल्यावर मनानेच औषध घेतात. मात्र कोणत्या औषधाचे काय परिणाम होतात, याबाबत नागरिक अनभिज्ञ असतो. आपल्याला येणारा ताप हा अनेक प्रकारचा असू शकतो. मात्र त्या तापावर योग्य ते औषध घेणे आवश्यक असते. आजारावर योग्य ते औषध घेतले नाही तर कधी कधी जिवावर बेतू शकते. ही माहिती असूनही अनेकजण बनावट किंवा शरीरास अपायकारक ठरणाऱ्या औषधांची विक्री करताना दिसून येतात. गेल्या १५ दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी थेरगाव, चिखली आणि पिंपरी परिसरात छापा घालून तीन गुन्हे दाखल केले आहेत.

पहिली घटना

शरीर सुदृढतेसाठी वापरण्यात येणारी मात्र शरीरास घातक असलेल्या इंजेक्शनचा साठा जगतापनगर, थेरगाव येथे असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून ॠषीकेश शहाजी साठे याला अटक केली. त्याने हा साठा नारायण नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी इंजेक्शनचा हा साठा जप्त केला.

दुसरी घटना

नशेसाठी वापरण्यात येणारी मेफेनटरमाइन सल्फेट ही इंजेक्शन गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने चिखलीच्या हद्दीतून जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी सुमित गणेश पिल्ले (वय ३२, रा. नेवाळेवस्ती, चिखली) आणि कनिष्ठराज उर्फ राणा अरुण सुरवसे (वय २१, रा. शरदनगर, चिखली) या दोघांना अटक केली.

तिसरी घटना

कर्करोगावर अत्यंत उपयुक्त असलेल्या ॲडसेट्रिस या इंजेक्शनच्या नावाने बनावट औषध विक्री होत असल्याची माहिती कंपनीने पिंपरी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून श्रीप्रसाद श्रीहरी कुलकर्णी (वय ४२, रा. सिंहगड रोड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपी कुलकर्णी याचे औषधाचे दुकान आहे. त्याच्याकडून साडेतीन लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली.

सावधगिरी कशी बाळगाल?

१नागरिकांनी स्वत:च्या मनाने कोणतीही औषधे खरेदी करू नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.

२ मेडिकलमध्ये दर्शनी भागावर शासनाने परवानगी दिलेली कागदपत्रे लावलेली असतात. ती कागदपत्रे आहेत की नाही याची खातरजमा रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी करावी. त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही

३जी औषधे खरेदी करता, त्याच्या मागील बाजूवर औषधे कधी तयार झाली, आणि त्या औषधांची मुदत लिहिलेली असते, ती पाहावी. तसेच रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असतो, तो देखील रुग्णांनी पाहावा.

४महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक शहरांमध्ये खुली औषधांची विक्री केली जाते. अशा खुल्या ठिकाणी विक्री होणार्‍या औषधांची रुग्णांनी अजिबात खरेदी करू नये.

५औषधे खरेदी केल्यावर त्याची पावती घेण्यास विसरू नये. अनेकदा काही दुकानदार हे औषध आमच्या दुकानातून घेतलेच नाही, असा आव आणतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest