संग्रहित छायाचित्र
चिखली : तडीपार केलेला गुंड त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी शहरात आला. तसेच त्याने स्वतःकडे शस्त्र बाळगल्याने त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (६ जून) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास तळवडे रोड, गणेशनगर, चिखली येथे करण्यात आली.
सुरज भगवान चोपडे (वय २१, रा. रुपीनगर, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार उद्धव खेडकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सुरज चोपडे यांना ६ एप्रिल २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो विनापरवानगी शहराच्या हद्दीत आला. तसेच त्याने स्वतःकडे कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनने सुरज चोपडे याला अटक केली.