भारती विद्यापीठ परिसरात ५७ लाखांचा अफू जप्त

भारती विद्यापीठ भागात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करून ५६ लाख ९० हजार रुपये किमतीचा अफू जप्त केला. देविलाल शंकरलाल आहीर (वय ४२, रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 30 Sep 2024
  • 02:17 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भारती विद्यापीठ भागात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करून ५६ लाख ९० हजार रुपये किमतीचा अफू जप्त केला. देविलाल शंकरलाल आहीर (वय ४२, रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस आयुक्तांनी शहरातील अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथक पोलीस ठाण्याच्या परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली. त्यानुसार आंबेगाव येथील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी आरोपी देविलाल याच्या ताब्यातून एकूण ५६ लाख ९० हजार रुपये किमतीचा २ किलो ८४५ ग्रॅम अफू जप्त करण्यात आला. तसेच माल लपविण्याकरीता वापरलेली दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest