पिंपरी-चिंचवड : रिव्हर्स येणाऱ्या टेम्पोने एकाला उडवले
महाळुंगे : रिव्हर्स येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात २२ जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एच पी चौक ते इंडुरंस सर्कल दरम्यानच्या रस्त्यावर महाळुंगे येथे घडला. मिलिंद व्हिक्टर कदम (रा. हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार राजू राठोड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक रवींद्र सुभाष कोकणे (वय ३७, रा. खराबवाडी, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी कोकणे त्याच्या ताब्यातील टेम्पो रिव्हर्स घेत होता. त्यावेळी टेम्पोची मिलिंद कदम यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात दुचाकीस्वार मिलिंद यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.