Advertisement

Nanded City Public School : नांदेड सिटीतील पब्लिक स्कूलच्या तिजोरीवर ॲडमिनचा डल्ला; तब्बल ३७ लाखांची फसवणूक

Nanded City Public School Nanded City Public School

पुणे :Nanded City Public School शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारे प्रकरण उघडकीस आले असून विद्या प्रतिष्ठानच्या नांदेड सिटी येथील पब्लिक स्कूलमध्ये तब्बल ३६.९९ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शाळेतील ऍडमिन विभागातील अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत घडला.

राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या आणि सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार आदी संचालक असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या नांदेड सिटी येथील पब्लिक स्कुलमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली.पवार पब्लिक स्कूलमध्ये एडमिन विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवर संस्थेची तब्बल ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपयांच्या फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी शाळेच्या प्रिन्सिपॉल वंदना सचिन जोशी (वय ५५, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून राजेंद्र अनपट, अश्विनी तरटे उर्फ अश्विनी अनपट (रा. युतिका एन्क्लेव्ह बिल्डींग,कोल्हेवाडी) यांच्या विरोधात भान्यास ३१६(२), ३१६(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र अनपट हे नांदेड सिटी पब्लिक स्कुलच्या एडमिन विभागात काम करतात. तर, अश्विनी अनपट या त्यांच्या पत्नी आहेत. यादोघांनी इंटरनेट बँकिंगचा वापर करून संस्थेच्या परवानगीशिवाय मोठी रक्कम स्वतःच्या खात्यांत वर्ग करून घेतली. प्राथमिक तपासात हा सर्व प्रकार उघड झाला आहे. तसेच, या व्यवहारांना झाकण्यासाठी संस्थेच्या अभिलेखात खोट्या नोंदी देखील नोंदवण्यात आल्या. या आर्थिक गैरव्यवहारातून आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत संस्थेचा विश्वासघात केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नांदेड सिटी पोलीस करत आहेत.

विद्या प्रतिष्ठान ही प्रतिथयश शिक्षण संस्था असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तर, उपाध्यक्ष एड. अशोक प्रभुणे असून युगेंद्र पवार हे खजिनदार आहेत. नीलिमा गुजर या सचिव आहेत, तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य होते. यासोबतच, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विठ्ठलदास मणियार, बाळासाहेब तावरे, डॉ. राजीव शाह, किरण गुजर, मंदार सिकची हे संचालक आहेत.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

IPL 2026 | मी मशीन नाही.! कामगिरीतील चढ-उतारावर बोलताना मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल...

Next Post

Pimpri Gas Pipeline Blast : मोहननगरमध्ये MNGL गॅस पाईपलाईन फुटली; स्फोटासारखा आवाज अन् एकजण जखमी, पाहा Video...