Crime News : बुधवार पेठेत १२ लाखांचे मेफेड्रोन जप्त, एकाला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

मेफेड्रोन हा अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १२ लाख १२ हजार रुपयांचे ५९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. बुधवार पेठेत ही कारवाई करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Tue, 17 Jun 2025
  • 08:30 am
pune news, pune mirror, civic mirror, pune police, marathi news

पुणे : मेफेड्रोन हा अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १२ लाख १२ हजार रुपयांचे ५९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. बुधवार पेठेत ही कारवाई करण्यात आली.

शरणप्पा नागप्पा कटिमणी (वय ३४, रा. दुगड शाळेजवळ, कात्रज, मूळ रा. भापर गल्ली, गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्यान्वये (एनडीपीएस ॲक्ट) फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक (दोन) बुधवार पेठेत गस्त घालत होते. त्या वेळी आरोपी  कटिमणी हा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी सय्यद साहिल नजीर शेख यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून कटिमणीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे मेफेड्रोन सापडले. त्याच्याकडून १२ लाख १२ हजार रुपयांचे ५९ ग्रॅम  मेफेड्रोन जप्त करण्यात आले. दरम्यान, कटिमणीने मेफेड्रोन कोणाकडून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास पोलीस तपास करीत आहेत.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, चेतन गायकवाड, मयूर सूर्यवंशी, साहिल शेख, उदय राक्षे, संदीप शेळके यांनी ही कारवाई केली.

Share this story

Latest