Advertisement

Crime News : खडकी भागात १० लाख ६० हजारांचे मॅफेड्रॉन जप्त, खडकी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा, एकजण अटकेत

खडकी भागात १० लाख ६० हजारांचे मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला जेरबंद करण्यात आले आहे.

पुणे: खडकी भागात १० लाख ६० हजारांचे मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला जेरबंद करण्यात आले आहे. बजरंगलाल भगवानराम खिल्लेरी (वय २१, रा. जाधववाडी, मोशी, पुणे मुळ रा. राजस्थान)  आणि दिनेशकुमार मनीलालजानी (रा. लालपूर, जि. जालौर, राजस्थान)  अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.  तर आरोपी खिल्लेरी याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई युवराज तुकाराम कांबळे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, बुधवारी (१६ एप्रिल) दुपारी एकच्या दरम्यान बोपोडी मेट्रो स्थानकाजवळ गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक दोनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोपी खिल्लेरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विक्रीसाठी जवळ बाळगलेला १० लाख ६० हजार रुपयांचा ५३ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ, ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल, एक लाख ८० हजार रुपयांची दुचाकी, कागदी वर्तमानपत्रे आणि २८ झीपवाल्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. 

दरम्यान, आरोपी खिल्लेरी याने दिनेशकुमार मनीलालजानी याच्याकडून मॅफेड्रॉन विक्रीसाठी घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून खिल्लेरी याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिघे तपास करीत आहेत.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

ISSF World Cup 2025 : भारताला मिळाली नवीन शूटिंग क्वीन...! १८ वर्षीय सुरुचीने मनू भाकरला हरवून जिंकले सुवर्णपदक...

Next Post

संपादकीय : हजारो वर्षांचा संघर्ष अखेर संपत का नाही?