दरवाजा उघडा ठेवणे पडले महागात; सदनिकेत घुसून मोबाईल चोरला, ; हडपसर पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या

रात्रीच्या वेळी अर्धवट उघड्या दरवाजावाटे सदनिकेत प्रवेश करून तीन मोबाईल चोरून नेणाऱ्या चोरट्याला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. कैन्हयालाल चेलाराम नटमारवाडी (वय २०, रा. लोणावळा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Sun, 27 Apr 2025
  • 02:07 pm
pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

सग्रहीत छायाचित्र

पुणे: रात्रीच्या वेळी अर्धवट उघड्या दरवाजावाटे सदनिकेत प्रवेश करून तीन मोबाईल चोरून नेणाऱ्या चोरट्याला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. कैन्हयालाल चेलाराम नटमारवाडी (वय २०, रा. लोणावळा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी हे मांजरी येथील जाई रेसिडन्सी या सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. २२ आणि २३ एप्रिलच्या रात्री फिर्यादी आणि त्यांचे मित्र सदनिकेचा दरवाजा अर्धवट उघडा ठेऊन झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने सदनिकेत प्रवेश केला आणि सदनिकेतील तीन मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान, पोलिसांचे तपास पथक या गुन्ह्याचा तपास करीत होते. तपास पथकाला खबऱ्याकडून आरोपी नटमारवाडी याच्याबद्दल माहिती मिळाली. मिळालेल्या महितीनुसार पोलिसांच्या तपास पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करून ४० हजार रुपयांचे तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले. पुढील तपास महिला पोलीस हवालदार राजश्री खैरे करीत आहेत. 

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Share this story

Latest