संग्रहित छायाचित्र
पुणे: वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीतून एक अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबरला वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सपोनि ढवळे, पोलीस अंमलदार शिंदे , भंडलकर व इतर स्टाफ गस्तीवर होते. यावेळी त्यांना एका अल्पवयीन बालकाकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी कॅनॉल रोडवरील, एपीजे अब्दुल कलाम शाळेजवळ, कर्वेनगर येथे जाऊन त्या बालकाकडून ते गावठी पिस्तूल जप्त केले. या पिस्तूलाची अंदाजे किंमत ४० हजार इतकी आहे.
या घटनेनंतर वारजे पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार व गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली.