एरोमॉलमध्ये राडा करणाऱ्यांना वेसण

विमानतळ येथील एरोमॉलमध्ये दहा जणांच्या जमावाने बेकायदा आत घुसून एका अज्ञात व्यक्तीला ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती. जमावाने मॉलमधील वस्तूंची मोडतोड करून २० हजार रुपयांचे नुकसानही केले होते. तेथील सुरक्षारक्षकाशी वाद घालून परिसरात दहशद पसरवण्याचाही प्रयत्न केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 6 Jun 2023
  • 11:49 pm
एरोमॉलमध्ये राडा करणाऱ्यांना वेसण

एरोमॉलमध्ये राडा करणाऱ्यांना वेसण

विमानतळावरील एरोमॉलमध्ये प्रवाशाला मारहाण करून तोडफोड केल्याने दहा जणांवर गुन्हा, पाच अटकेत

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

विमानतळ येथील एरोमॉलमध्ये दहा जणांच्या जमावाने बेकायदा आत घुसून एका अज्ञात व्यक्तीला ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती. जमावाने मॉलमधील वस्तूंची मोडतोड करून २० हजार रुपयांचे नुकसानही केले होते. तेथील सुरक्षारक्षकाशी वाद घालून परिसरात दहशद पसरवण्याचाही प्रयत्न केला. 

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मिलिंद बाळासो गाडवे (वय ३८, रा. पवार प्लॉट सांगलीवाडी, सांगली),  मनोज अशोक पसारे (वय २६, रा. बर्माशेल, लोहगाव), आयुष अनिल पवार (वय १९, रा.  बर्माशेल, लोहगाव), सूरज राजू गरुड (वय २३, रा. बर्माशेल लोहगाव), ओंकार बाबू बरनेत (वय १८, रा. बर्माशेल, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. न्यायालयाने त्यांना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एरोमॉलच्या बाहेर रविवारी एक अनोळखी प्रवासी पानटपरीवर सिगारेट विकत घेत होता. त्या वेळी त्याची आणि पानटपरी मालकाची बाचाबाची झाली. त्या प्रवाशाने मद्यप्राशन केले असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. थोड्याच वेळात त्यांच्यातील वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यामुळे तेथे गर्दी गोळा झाली. त्यांच्यातील भांडणाचा आवाज ऐकून पानटपरीचा मालक मनोज अशोक पसारे याने त्या अनोळखी प्रवाशाला मारहाण करायला सुरुवात केली. सोबत जमलेले लोकही त्याला मारहाण करू लागले. त्यांच्या तावडीतून स्वतःला सोडवण्यासाठी तो वाट फुटेल त्या दिशेने धावू लागला. धावत धावत तो एरोमॉलच्या गेट नं १ मधून आत घुसला. त्याच्या पाठोपाठ त्याच्या मागे लागलेला दहा जणांचा जमावही आत घुसला. त्या जमावाने प्रवाशाचा पाठलाग करून त्याला मॉलमध्ये मारहाण केली. तो तेथून वरच्या मजल्यावर पळाला. मात्र, चिडलेल्या जमावाने त्याचा पाठलाग करत त्याला पुन्हा गाठले आणि मारहाण केली. त्या वेळी त्यांनी मॉलमधील स्टूल, मेटल डिटेक्टर इत्यादी साहित्य फेकून मारले. तेवढ्यात मॉलमधील सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून जमावाला आवरले आणि अनोळखी व्यक्तीची त्यांच्या तावडीतून सुटका करत त्याला लिफ्टने खाली नेले व त्याच्या गाडीजवळ सोडले. मात्र, या वेळी सुरक्षारक्षकांशीही जमावाने वाद घातला आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

सार्वजनिक जागेत मारहाण केली आणि मॉलमधील वस्तूंची तोडफोड केली, तसेच २० हजार रुपयांचे नुकसान करून दहशत पसरवली म्हणून मॉलमधील एका व्यक्तीने विमानतळ पोलीस ठाण्यात जमवाविरोधात तक्रार दाखल केली. मॉलमध्ये विविध शहरातून आणि परदेशातूनही प्रवासी येत असतात. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी तक्रार करण्यात आली असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी एकूण दहा जणांवर भारतीय दंड विधानातील विविध कलमान्वये आणि क्रिमिनल लॉ अमेन्डमेन्ट ॲॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest